विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडवणारे शिक्षण महत्त्वाचे” – प्राचार्य डॉ. सुशील कुंजलवार”
जितेंद्र नागदेवते
सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
8806689909
सिंदेवाही :- सर्वोदय महाविद्यालय, सिंदेवाही येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग तर्फे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त
18 तास अभ्यास अभियान अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये वकृत्व स्पर्धा, गीतगायन, परिसंवाद, निबंध लेखन तसेच चित्रकला स्पर्धेचा समावेश होता.
या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुशील कुंजलवार होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची नितांत आवश्यकता आहे. शिक्षण फक्त पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित नसावे, तर ते विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देणारे असावे. महाविद्यालय हे केवळ शिक्षणाचे केंद्र नसून विद्यार्थ्यांना विचारांची दिशा देणारे, आत्मविश्वास निर्माण करणारे आणि समाजात सकारात्मक बदल घडवणारे स्थान असावे. असे सांगितले. आजच्या या स्पर्धा म्हणजे केवळ स्पर्धा नसून, त्या विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणाऱ्या एक सुवर्णसंधी आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अशा उपक्रमांचे आयोजन म्हणजे त्यांना खरी आदरांजली असल्याचे म्हणाले.
मार्गदर्शक म्हणून डॉ. राजेश डहारे यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले पत्रकार लक्ष्मीकांत कामतवार जितेंद्र नागदेवते आणि संतोष नन्नावार यांनीही विद्यार्थ्यांना सामाजिक जाणिवा जागृत ठेवण्याचे महत्व अधोरेखित केले.
कार्यक्रमादरम्यान डॉ. रमेश राठोड यांनी उपस्थितांना ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत शपथ दिली. उपस्थित विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी नशा मुक्ततेसाठी प्रतिज्ञा घेतली.
समारोपप्रसंगी स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
रासेयो कार्यक्रम अधिकारी आणि सर्व स्पर्धांचे संयोजक डॉ. रिझवान शेख यांनी प्रस्तावना केली. आपल्या प्रस्तावनेत
त्यांनी सर्व सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा साहेबराव आड़े तर रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. अमित उके यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थीयांनी विशेष सहकार्य केले.