नागपूरात अल्पवयीन नातीने प्रियकराशी संगममत करुन स्वता:च्या आजीचा चिरला गळा.

✒युवराज मेश्राम, नागपुर जिल्हा प्रतिनिधी✒
नागपूर:- नागपुर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यामुळे सर्वीकडे संताप आणि हळहळ व्यक्य करण्यात येत आहे. नागपूर येथे राहणा-या वृद्ध महिलेचा खून झाल्यानं संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती. या बाबतचा तपास केल्यानंतर अत्यंत धक्कादायक बाब समोर आली. संबंधित वृद्ध महिलेची हत्या तिच्याच नातीने केली असल्याचं समोर आलं. यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला. या हत्येमागील कारण ऐकून सर्वच हैराण झाले. संबंधित अल्पवयीन आरोपी ही अवघ्या 17 वर्षांची आहे.
मृत झालेल्या आजीचं नाव विजयाबाई पांडूरंग तिवलक असं असून त्या घरात एकट्या राहत होत्या. विजयाबाई यांना एक मुलगा असून तो त्याच्या पत्नीसोबत क्वाटरमध्ये वेगळा राहतो. त्याला एक मुलगा आणि दोन मुली आहेत. यामधील दोन मुलींचं लग्न झालं आहे. शनिवारी दुपारी सुमारे 1 वाजता विजयाबाई यांची मोलकरीण घरी कामाला आली असता तिने आजींना बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पाहिलं. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
हत्येतील आरोपीचा शोध लावण्यासाठी पोलिसांनी विजयाबाई यांच्या सर्व कुटुंबियांना बोलावून घेतलं. मात्र यादरम्यान, विजयाबाई यांची एक नात उपस्थित नव्हती. याबाबतची चौकशी केली असता संबंधित नात तिच्या मुस्लिम प्रियकरासोबत वेगळी राहत असल्याचं समोर आलं. पोलिसांना नातीवर संशय आल्याने त्यांनी अधिक तपास केला. यादरम्यान संबंधित नात हत्येच्या दरम्यान आजीच्या घरी असल्याचं तांत्रिक पुराव्यातून समोर आलं.
दरम्यान, अधिक तपास केल्यानंतर संबंधित नातीच्या पतीचे मित्र देखील घटनास्थळी आले असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपी मित्रांना अटक केली. त्यांची चौकशी केल्यानंतर आरोपी नातीने आपल्याला आजीच्या घरी चोरी करण्यास सांगितलं असल्याचं मित्रांनी स्पष्ट केलं. यानंतर पोलिसांनी आजींची नात आणि नातीचा प्रियकर या दोघांनाही अटक केली असून नातीच्या प्रियकराला व्यवसाय चालू करण्यास पैसे लागत होते. आजीकडील पैसे आणि दागिने चोरी करताना आजींना जाग लागली असून आपलं भांडं फुटु नये, यासाठी ही हत्या करण्यात आली.