ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वापरतांना शुद्ध पाणी आवश्यक. डॉ. गुलवाडे.

56

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वापरतांना शुद्ध पाणी आवश्यक. डॉ. गुलवाडे.

पांढरकवड्यात पाझारेंनीं केले हस्तांतरण.

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वापरतांना शुद्ध पाणी आवश्यक. डॉ. गुलवाडे.
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वापरतांना शुद्ध पाणी आवश्यक. डॉ. गुलवाडे.

✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
चंद्रपूर :- कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ही मशीन रुग्णांसाठी जीवनदायिनी ठरणार आहे. ज्या रुग्णांची ऑक्सिजन पातळी कमी होते अशा रुग्णांना जगविण्यासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वरदान आहे. याचा वापर करताना शुद्ध पाण्याचा वापर केल्यास म्युकरमायकोसिस या भयावह आजाराचा संभाव्य धोका टाळता येऊ शकतो, अशी माहिती भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष डॉक्टर मंगेश गुलवाडे यांनी दिली. ते पांढरकवडा ग्रामपंचायत येथे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनच्या हस्तांतरण प्रसंगी बोलत होते.
यावेळी जिप सदस्य ब्रिजभूषण पाझारे, भाजपा कोषाध्यक्ष प्रकाश धारणे,माध्यम संपर्क प्रमुख प्रशांत विघ्नेश्वर,वैद्यकीय अधिकारी डॉ प्रतिमा तिवारी, सरपंच सुरेश बोबडे, उपसरपंच समीर भिवापुरे, ग्रामपंचायत सदस्य संगीता सोनटक्के, सचिन टिपले, विजय वैरागडे, कवडू उपासे, श्रीमती गावंडे, श्रीमती गुरनुले ,कैलाश खंडारकर, सुनील लांजेकर, सुधाकर मादाडे, बंडू गुरनुले, श्रावण पिंपळकर, शिवाजी सोनटक्के, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

याप्रसंगी भाजपा महामंत्री ब्रिजभूषण पाझारे यांच्या हस्ते पांढरकवडा प्राथमिक आरोग्य केंद्र च्या प्रमुख डॉक्टर प्रतिमा तिवारी यांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन प्रदान करण्यात आली. यावेळी बोलताना पाझारे म्हणाले, लोकनेते आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून मुंबईतील रत्न निधी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे जिल्ह्यातील जनतेच्या सेवेसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन उपलब्ध झाल्या आहेत. महानगरामध्ये ही सेवा दिली जात असताना ग्रामीण भागातील जनतेला ही सेवा मिळावी म्हणून आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी पांढरकवडावायांसाठी हि मशीन पाठविली आहे. या मशीन मुळे पांढरकवडा येथील कोरोनाग्रस्तांचे जीवन रक्षण केले जाणार आहे. नागरिकांनी कोरोनाच्या काळात जागरूक राहून दैनंदिन व्यवहार करावे. कोरोनाला हरविण्यापेक्षा जिंकण्यावर भर द्यावा,असे आवाहन त्यांनी केले.सरपंच बोबडे यांनी आभार मानले.