चिमूर तालुक्यातील विहिरगाव येथे वाघाच्या हल्ल्यात दोघे जखमी

चिमूर तालुक्यातील विहिरगाव येथे वाघाच्या हल्ल्यात दोघे जखमी

चिमूर तालुक्यातील विहिरगाव येथे वाघाच्या हल्ल्यात दोघे जखमी

🖋अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

नेरी : चिमूर तालुक्यातील ताडोबा बफर झोन क्षेत्रात येणाऱ्या पळसगाव वनपरिक्षेत्रातील विहीरगाव परिसरात वाघाने हल्ला करून दोघांना जखमी केल्याची घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शेत सर्वे नंबर ७३ मध्ये पांडूरंग शिवबा धाडसे यांची गाय वाघाने ठार केली. गायीला पाहण्यासाठी गावातील काही नागरिक गेले असता दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. शंकर रतीराम धाडसे (३०) आणि अमित विठ्ठल नन्नावरे (२६) या दोघांवर हल्ला करताच. नागरिकांनी आरडाओरड केल्यामुळे वाघाने तेथून जंगलात पळ काढला. दोघाही जखमींना प्राथमिक उपचाराकरिता चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून तपासणी केली असता जखम गंभीर असल्यामुळे पुढील उपचाराकरिता नागपूरला हलविण्याचा सल्ला दिला. जखमींना वनविभागाकडून वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या माध्यमातुन प्रत्येकी २० हजारांची मदत देण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी दिली आहे.