सनईचे सुर लपले अन् डिजेमुळे आजार वाढले…!
सौ.संगीता संतोष ठलाल
मु.कुरखेडा जि.गडचिरोली
मो: ७८२१८१६४८५
एके काळी लग्न समारंभात सनईच्या साह्याने वाजविले जाणारे अतिशय सुरेल असे सुर ऐकायला मिळत होते आणि आजही काही ठिकाणी मोजक्याच प्रमाणात ऐकायला मिळत असतात. पण,म्हणतात ना की,जुनं ते सोनं असतं तेच बरोबर होतं त्यापासून कोणालाही त्रास होत नव्हता उलट ते, कानावर पडताच मन अगदी प्रसन्न होऊन जात असे.त्याच प्रमाणे लग्न समारंभात असो, किंवा देवीचे विसर्जन करायचे असले की,ढोलक, झांज, बिजघंटा या प्रकारचे वाद्य वाजवले जायचे सोबत संताचे अभंग, भजन गाऊन नाचत, नाचत भक्तीत तल्लीन होऊन देवीचे विसर्जन करायचे बघताना असं वाटत होत की, हे सर्वजण वारकरी पांडुरंगाला भेटायला जात आहेत की ,काय असच वाटत असायचे.त्याच प्रमाणे लग्न समारंभात सनईचे सुर ऐकायला मिळायचे तेव्हा, वाजविणाऱ्या त्या, कलावंताचे कौतुक करताना बघायला मिळायचे ते सर्व दृश्य, आठवणी खूप मागे गेलेल्या आहेत. ज्या, वस्तूंपासून कधी त्रास होत नव्हता तेच आजकाल लोकांना नको वाटत आहे आणि ज्या पासून दोन्हीही कान निका मी होत आहेत तेच हवेहवेसे वाटत आहेत खरच अशा व्यर्थ विचारसरणीला काय म्हणावे…?
खऱ्या गोष्टींवर बोलले तर..कोणालाही राग येतो पण,हे सत्य आहे सनई किंवा जुने वाद्य हळूहळू लोप पावतांना दिसत आहेत जसे, जुने आचार विचार लोप पावतात त्याच प्रमाणे जुन्या वस्तूंची कोणी किंमत करत नाही. म्हणूनच जसे माणसाचे आचार, विचार बदलले त्या प्रमाणे नको, त्या गोष्टी हव्या वाटायला लागल्या आहेत. आज प्रत्येक कार्यक्रमात आपल्याला बघायला मिळत असते कोणी आपल्या परिस्थिती नुसार छान कार्यक्रमाचे आयोजन करतात मग ते लग्न समारंभ असो किंवा इतर कोणतेही कार्यक्रम असोत, त्या कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी व आनंद घेण्यासाठी सहकुटुंब उपस्थित असतात पण,त्या जागी सनई, बॅन्ड च्या ऐवजी डिजेला आमत्रण दिले जाते. मग बघाच डिजे वाजायला लागला की, बिनधास्तपणे नाचायला लागतात. प्रश्न इथे नाचण्याचा नाही तर…डिजेच्या वाढत्या आवाजावर आहे.
हे आपण वाचलंत का?
डिजेचा जास्त आवाज वाढवतात आणि ह्याच अति आवाजामुळे अनेकांना धोका उद्भवत असतो या विषयावर मी धोडक्यात लिहीत आहे एका ठिकाणी लग्न होतं भरपूर पाहुणे जमले होते जेवणाच्या पंगतीला सुरूवात झाली होती ऐन त्याच वेळी, डिजे वाजायला लागला एवढा भारि आवाज होता की, तो आवाज ऐकून तेथे उपस्थित असलेल्या बहुसंख्य महिलांनी व पुरूषांनि कानाला झाकण्यासाठी रुमाल बांधले जसे हिवाळ्यात थंडी लागते ल बांधतात अगदी त्यासारखे ममी सुध्दा कापसाचे छोटे गोळे करुन कानात टाकली व वरतून रूमाल बांधली असे,चित्र कुठेतरी विचार करायला लावणारे आहेत. कारण, डिजेच्या वाढत्या आवाजामुळे तेथे उपस्थित असलेल्या किती लोकांना त्रास सहन करावा लागतो याकडे मात्र कोणाचे लक्ष जात नाही. पुन्हा एक गोष्ट ती म्हणजेच गर्भवती महिला तिथे जर..उपस्थित असेल तर.. तिचं काय व्हावं. ..? प्रत्येकांची प्रकृती एक सारखी नसते मागे एकदा वृतपत्रात एक बातमी वाचण्यात आली होती कि,डिजेच्या आवाजामुळे नवरदेवाचा मृत्यू झाला होता, तसेच एका माणसाचे दोन्हीही कान निका मी झाले होते आपणच विचार करा या डिजेमुळे फायदा काहीच दिसत नाही उलट धोका जाणवताना दिसत आहे मग हे, नेमके डिजे कशाला…? हे कोणाला कधी कळणार…? हा सुद्धा एक भारी मोठा प्रश्न आहे.
म्हणून प्रत्येकांनी या होणाऱ्या धोक्यापासून व आजारापासून सावध रहाणे आवश्यक आहे. आजच्या माणसाला सर्व काही कळताना सुद्धा स्वतः लाही त्रास करून घेत आहे सोबतच इतरांना ही त्रास देण्यासाठी उत्सुक आहे. तेवढेच पैसे गोर,गरीबांना दान केले तर, वाया जाणार नाही. हे सर्व कधी समजेल…?