कचरा” प्रत्येकाने बघावा असा अप्रतिम लघुपट कचरा नेमकं काय असते हो?

62

कचरा”
प्रत्येकाने बघावा असा अप्रतिम लघुपट
कचरा नेमकं काय असते हो?

कचरा" प्रत्येकाने बघावा असा अप्रतिम लघुपट कचरा नेमकं काय असते हो?
कचरा”
प्रत्येकाने बघावा असा अप्रतिम लघुपट
कचरा नेमकं काय असते हो?

आपण ज्या वस्तू हौसेने घरात आणतो, त्याचा वापर करतो , वापर झाला ,वस्तू जुन्या झाल्या ,खराब झाल्या ,उपयोगाच्या राहिल्या नाही किंवा तीच मूल्य हरवून बसल्या का आपण त्याला निकाली काढतो.
घराबाहेर फेकून देतो. त्याची विल्हेवाट लावतो. आणि ती अतिशय आवश्यक गोष्ट असते कारण तो तसाच साचून राहिला ,दुर्लक्षिला गेला वा जाणीवपूर्वक प्रेमाने जपून जरी ठेवला तरी तो उपद्रवीच ठरतो, स्वतःबरोबर इतरांनाही अपायकारक , त्रासदायक ठरतो. स्वतःबरोबर सामाजिक स्वास्थही बिघडवतो…

कचऱ्याच्या विल्हेवाट लावण्यासाठी आपल्या समाजव्यवस्थेने काही लोक समुदायाला कायमस्वरूपी वेठीस धरलं, त्यांचीही जाती निर्माण करून ठेवल्या , कचरा करणारा आणि तो साफ करणारा अश्या संबंधावर आधारित समाज उभा राहिला… कचरा साफ करणारा तास श्रेष्ठच मोठ्या मनाचा धनी असायला हवा होता पण आपला धर्मसमाजसंस्कृतीच उर्फ़टी, माणुसघाणी असल्यामुळे तिने कचरा साफ करणाऱ्यांची सामाजिक प्रतिष्ठा सुद्धा कचऱ्यासारखीच करून सोडली…

#कचरा हा लघुचित्रपट अश्याच प्रकारच्या कचऱ्यावर भाष्य करतो पण तो तुमच्या आमच्या घरातील वा रस्त्यांवरील कचरा नाही तर सामाजिक-मानसिक कचऱ्यावर भाष्य करतो, हा कचरा आहे कुळ, जात ,वर्ण,धर्म, लिंगाचा हा कचराही शेकडो वर्षांपासून साचलाय , त्यातून दुर्गंध सुटलाय ,त्याने सामाजिक स्वास्थ बिघडवल्य, आणि तरीही अनेकांनी तो प्रेमाने जपून ठेवलाय ,नुसताच जपून नाही ठेवलाय तर तो पुढील पिढीकडे वहन करून नेतोय. या कचऱ्याने काहींचे सामाजिक जीवन किलकिले करून सोडलंय तर जपून ठेवणार्याच्याही जीवनात अस्वस्थता पसरविली आहे. कारण तो शेवटी कचरा आहे तो दुर्गंधी, अनारोग्या शिवाय दुसरं काही देत नाही.

या लघु चित्रपटात दोन व्यक्ती रेखा उभ्या केल्या आहेत. सुशिक्षित नव्या पिढीचे नेतृत्व करणारे ,आपल्या कर्तृत्वाने,सर्जनशीलतेने पुढे आलेली, आधुनिक शहरांमध्ये आत्मविश्वासाने वावरणारी,आपल्या आशा-आकांक्षा स्वप्ने डोळ्यात घेऊन जगणारी ज्यांनी आपला गतइतिहास कधीचाच मागे टाकलेला…अशी ही दोन तरुण मुले. पण लोकांच्या मनातील जातीची घाण जैसे थे ,त्यामुळे त्यांचं कर्तृत्व ,सर्जनशीलता ,आत्मविश्वासाने पुढे येणं कस क्षणात धाराशाही करत. हे अतिशय दाहक पद्धतीने मांडलंय. ही पिढ्यान पिढ्या साचलेली आणि जपलेली “कचरा” मानसिकता, गंधगी ब्लॅक अँड व्हाइट फ्रेम मधून जेव्हा बाहेर पडते तेव्हा बघणाऱ्यांच्या मनमस्तिष्कावर सपा सपा वार करत सुटते…आणि त्यासोबतच असलेलं म्युझिक हे आपल्या हृदयावर ओरखंडे पाडत मानसिक सामाजिक पर्यवरणाच्या अस्वच्छता निर्मूलनाचे महत्व अधोरेखित करत जाते.

चित्रपट दिग्दर्शकाने ‘कचरा’ ही कन्सेप्ट वापरून समाजातील व्यक्ती व्यक्तीं मधील परस्पर निकोप संबंधांवर दुष्परिणाम करणाऱ्या, त्यातून सामाजिक स्वास्थ बिघडवणार्या, व्यक्तीला मनोविकृत करणाऱ्या, समाजात व्याप्त अशा अमूर्त स्वरूपात असलेल्या मानसिक-सामाजिक कचऱ्याला ,दुर्गंधीला उघड पाडलंय.. जातीय विकृत मानसिकतेवर एव्हढं उघड भाष्य केलेलं तुम्हाला प्रस्थापितांच्या कलाकृतींमधून कधीच बघायला मिळणार नाही ते नेहमीच हे सामाजिक वास्तव दडपून टाकण्याचा प्रयत्न करतात ते असो आपण मात्र आपल्या तुंडपूज्य साधनांद्वारे शक्य तो प्रयत्न करत राहील पाहिजे…
भांडून बघितल आता मांडून बघूया…..

चित्रपट दिग्दर्शक निर्माते आणि एकूणच पूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन आणि आभार🙏

~ योगेश भागवतकर