*शहर विकास योजनेचे काम पारदर्शक असावे : प्रा सुयोगकुमार बाळबुधे*
————————
*भा. ज. यु. मो. तर्फे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदना द्वारे मागणी*

————————
*भा. ज. यु. मो. तर्फे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदना द्वारे मागणी*
ब्रम्हपुरी :
शहर विकास योजना आराखडा कंत्राट मंजुरी प्रकरणात सत्ताधारी पक्ष एकमेकांसामोर उभे ठाकल्याने संपूर्ण शहराचे वातावरण ढवळून निघाले आहे यामुळे भारतीय जनता युवा मोर्चा चे शहर अध्यक्ष, उच्चशिक्षित युवा नेतृत्व प्रा. सुयोगकुमार वा. बाळबुधे यांनी शहर विकास योजनेचे काम पारदर्शक असावे अशी मागणी केली आहे.
नगरपरिषद ब्रम्हपुरी मध्ये बहुमताने सत्तेत असलेल्या कांग्रेस पक्षाने शहर विकास योजना आराखडा कंत्राट मंजूर करण्यासंदर्भात पालिकेत ठराव घेत मंजुरी मिळवून विकास योजना आराखडा कार्यारंभ आदेश काढला.
परंतु नगरपरिषद च्या माध्यमातून गोरबारिबांची सेवा करण्या ऐवजी करोडो रुपयाचा बेकायदेशीर कंत्राट मंजुरीचा डाव आखणाऱ्या मुख्याधिकारी आणी नगरअध्यक्ष यांच्यावर कार्यवाही करा अशी मागणी करीत,ब्रम्हपुरी नगरपरिषद चे सत्ताधारी कांग्रेस पक्षातील नगरसेवक तथा नियोजन समिती सभापती ऍड श्री दीपक शुक्ला यांनी विरोध केला असल्याने शहर विकास योजने चे काम पारदर्शक असावे अश्या आशयाचे निवेदन भा. ज. यु. मो. च्या वतीने प्रा. सुयोगकुमार बाळबुधे यांनी पालकमंत्री व जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना दिले आहे.