नागभीड मध्ये युवक काँग्रेसच्या वतीने मशाल मोर्चा
श्री प्रदीप मनोहर खापर्डे
कानपा ग्रामीण प्रतिनिधी
मो. न. 8329084432
कान्पा – नागभीड दिनांक 17/6/2022 ला चिमुर विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने चिमुर विधानसभा युवक काँग्रेस चे महासचिव माननीय श्री अमोल भाऊ वानखेडे यांचे नेतृत्व व माननीय श्री आशिक भाई शेख महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव चंद्रपूर जिल्हा प्रभारी व माननीय श्री साईश दादा वारजुरकर, प्रदेश महासचिव तसेच माननीय शंतनू दादा धोटे चंद्रपूर जिल्हा युवक अध्यक्ष, माननीय रोशन ढोक, चिमूर विधानसभा युवक काँग्रेस यांचे प्रमुख उपस्थितीत नागभीड येथे विशाल मशाल मोर्चा काढण्यात आला.
मोदी सरकारने काँग्रेस नेत्या आदरणीय मा. सोनिया गांधी व आदरणीय मा. राहुल गांधी यांच्या विरोधात सूड बुद्धीने ईडीची कारवाई केल्याचे निषेधार्थ मशाल मोर्चा नागभीड तालुका काँग्रेस कार्यालयापासून ते राम मंदिर चौक पर्यंत आयोजित करण्यात आला होता. या मोर्चात नागभीड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री प्रमोदभाऊ चौधरी, उपाध्यक्ष श्री रमेश भाऊ ठाकरे श्री सागर खोबरागडे, श्री सौरभ मुळे, श्री सुरेश चौधरी माजी सरपंच श्री किशोर समर्थ, श्री महेशभाऊ कुर्जेकर, माजी नगर सेवक श्री दिनेश भाऊ गावंडे, श्री संजय भाऊ अमृतकर, श्री प्रतिक भसीन, धारणे ताई, माटे ताई, श्री अनंतराव राहुल, श्री सोनू क ठारे, श्री पंकज भाऊ काळबांधे, श्री पारस भाऊ नागरे, श्री बबन धारणे, श्री राकेश मेश्राम, यांच्यासह अनेक युवक काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.