दहावी परीक्षेत पोलादपूर तालुक्यात ११ माध्यमिक शाळा १०० टक्के निकालाच्या मानकरी !
✍🏻 संदिप जाबडे📰
पोलादपूर तालुका प्रतिनिधी
संपर्क📱 – 8149042267
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ मुंबई विभागीय मंडळ वाशी नवी मुंबई यांचेमार्फत मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे चा निकाल आज १७ जून रोजी ऑनलाइन जाहीर झाला असून यामध्ये पोलादपूर तालुक्यातील एकूण ११ शाळा 100% निकालाच्या मानकरी ठरल्या आहेत.
यामध्ये कांगोरीगड माध्यमिक विद्यालय मोरसडे, स्वर्गीय शांताराम शंकर जाधव न्यू इंग्लिश स्कूल पळचिल, तानाजी शेलारमामा प्रशाला उमरठ, माध्यमिक विद्यालय साखर, नरवीर तानाजी मालुसरे विद्यालय देवळे, माऊली प्रशाला कोतवाल, श्रीराम विद्यालय लोहारे, न्यू इंग्लिश स्कूल तुर्भे, माध्यमिक विद्यालय गोळेगणी, हाजी अली आदाम अनावरे विद्यालय वावे, माध्यमिक विद्यालय सवाद या शाळांचा शंभर टक्के निकाल लागला असून विद्यामंदिर पोलादपूर निकाल ९०.२६,% टक्के तर माध्यमिक विद्यालय कापडे ९०.८२% टक्के निकाल, न्यू इंग्लिश स्कूल ओंबळी ९०% टक्के, तर न्यू इंग्लिश स्कूल पैठण शाळेचा ८०% टक्के इतका निकाल जाहीर झाला आहे. या सर्व शाळा प्रशासनाकडून गुणवंत यशवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
विद्यामंदिर पोलादपूर विद्यालयातून ११३ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते पैकी १०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या शाळेतून मांढरे निल विकास याला ८९ टक्के गुण प्राप्त झाले असून शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळाला आहे. तर द्वितीय क्रमांक पालकर कोमल किशोर यास ८८.६० टक्के गुण प्राप्त झाले आहेत. तसेच साळुंखे तेजस तुकाराम व फोफळे सुयश बाबासाहेब यांना ८०.२० टक्के गुण प्राप्त झाले असून हे दोघे तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत.
तर कांगोरीगड माध्यमिक विद्यालय मोरसडे प्रथम क्रमांक करिश्मा शंकर गोगावले – ८८.८८% द्वितीय क्रमांक नितेश नरेश सुतार- ८६.२०% , तसेच तृतीय क्रमांक प्रगती निवृत्ती गोगावले – ८५.६०% व कृष्णाबाई रमेश नरे – ८५.६०% यांना विभागून मिळाला आहे.