मल्टिपेशालिटी हॉस्पिटल एटापल्लीत सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज,

मल्टिपेशालिटी हॉस्पिटल एटापल्लीत सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज,

मल्टिपेशालिटी हॉस्पिटल एटापल्लीत सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज,

मारोती कांबळे
गडचिरोली जिल्ह्या ग्रामीण प्रतिनिधी मो.न.९४०५७२०५९३

जिल्हाधिकारी संजय मिना यांना चोवीस ग्रामपंचायतींचे ठराव सादर,

एटापल्ली; तालुक्याच्या नावाने मंजूर असलेले मल्टिपेशालिटी हॉस्पिटल एटापल्लीत सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरी पत्राची प्रतीक्षा असल्याचे जिल्हाधिकारी संजय मिना यांनी आरोग्य विषयी संघर्ष समितीच्या वतीने चोवीस ग्रामपंचायतींचे ठराव सादर करतांना झालेल्या चर्चे दरम्यान अध्यक्ष संजय चरडुके व शिष्टमंडळाला सांगितले आहे.
ग्रामपंचायत उडेरा, हालेवारा, जवेली खुर्द, जांबिया, गट्टा, मानेवारा, चोखेवाडा, जवेली बूज, कसनसुर, येमली, गेदा, वाघेझरी, कोटमी, गर्देवाडा, तुमरगुंडा, कांदोळी, पुरसलगोंदी, सरखेडा, बुर्गी, वडसा खुर्द, वांगेतुरी, कोहका, दिंडवी व मेडरी अशा चोवीस ग्रामपंचायतीने संमत केलेल्या ठरावांच्या प्रति व दहा हजार नागरिकांच्या सह्यांचे निवेदन आरोग्यविषयी संघर्ष समिती अध्यक्ष संजय चरडुके, सचिन मोतकुलवार, महेश पुल्लूरवार, मनोहर बोरकर, सुरज जक्कुलवार व आकाश मजुमदार यांनी 15 जून बुधवारी जिल्हाधिकारी संजय मिना यांना सादर केले, यावेळी जिल्हाधिकारी संजय मिना यांनी अतिदुर्गम, मागास, आदिवासी बहुल व नक्षल प्रभावी भागातील विकास, भौतिक व मूलभूत सोयी सुविधा निर्माण करण्याचे प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून केले जात असून नागरिकांना आरोग्याची सक्षम सुविधा मिळण्यासाठी मल्टिपेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येत आहेत, गडचिरोली येथे शासकीय मल्टिपेशालिटी हॉस्पिटल व एटापल्ली येथे लॉयलड्स मेटल व त्रिवेणी अर्थमूव्हर्स कंपनीकडून मल्टिपेशालिटी हॉस्पीटल सुरू करण्यास जिल्हा प्रशासन तयारी करीत असल्याचे आरोग्यविषयी संघर्ष समितीच्या प्रतिनिधींना सांगितले आहे,
गेली दोन महिन्यांपूर्वी नगरविकास, सार्वजनिक बांधकाम तथा गडचिरोली जिल्हा पालकमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी सुरजागड पहाडीवरील एका कार्यक्रमात लॉयल्डस मेटल व त्रिवेणी अर्थमूव्हर्स कंपनीकडून अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथे मल्टिपेशालिटी हॉस्पीटल सुरू केले जाणार असल्याची घोषणा केली होती, त्यामुळे स्थानिक विविध पक्ष, संघटना व नागरिकांनी एटापल्लीच्या नावाचे मंजूर असलेले मल्टिपेशालिटी हॉस्पिटल अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथे हलविले जाणे एटापल्लीच्या नागरिकांवर अन्यायकारक असल्याचे निवेदन जिल्हा पालकमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांना, मुख्यामंत्री नामदार उद्धव ठाकरे यांना प्रशासकीय पाठविण्यात आले होते, तसेच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार अशोक नेते, आमदार डॉ देवराव होडी, यांनाही निवेदने देऊन एटापल्लीच्या नावाने मंजूर मल्टिपेशालिटी हॉस्पिटल एटापल्लीतच सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती, सदरचे निवेदनावरून आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी संजय मिना यांना पत्र पाठवून मल्टिपेशालिटी हॉस्पीटल एटापल्लीत सुरू करण्याचे सुचविले होते, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील बैठकीत मल्टिपेशालिटी हॉस्पिटल एटापल्लीतच सुरू करण्याच्या मागणीवर मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे यांनी एटापल्ली तालुक्यातील आरोग्य सेवेची समस्या गांभीर्यपूर्वक घेऊन मल्टिपेशालिटी हॉस्पिटल एटपल्लीत सुरू करण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
लॉयलड्स मेटल व त्रिवेणी अर्थमूव्हर्स प्रशासनालाही नागरिकांकडून निवेदन देण्यात आले असून कंपनी प्रशासनाकडूनही मागणीला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे, जिल्हाधिकारी संजय मिना यांनी चालविलेले प्रयत्न व आदिवासी बहुल एटापल्ली तालुक्याविषयीच्या आपुलकीचे नागरिकांकडून आभार मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here