पढेगावच्या यशवंत विद्यालयात नवागतांचे स्वागत

संजय महाजन

शिर्डी प्रतिनिधी

       दरवर्षीप्रमाणे याही वर्षी इयत्ता पाचवी ते दहावीला नवीन आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत आणि मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप यशवंत विद्यालय पढेगाव येथे संपन्न झाले. यावेळीSSC/HSC परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला. विद्यालयाने आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवत इ.10वी, इ.12 वी च्या निकालात घवघवीत यश संपादन केले.यावेळी बाळासाहेब तनपुरे, बापूसाहेब काळे,शिवाजीराव लबडे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

          या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य अण्णासाहेब पा.बनकर होते,तसेच व्यासपीठावर अच्युतराव पा.बनकर,बापूसाहेब पा.काळे,माजी प्राचार्य शिवाजीराव लबडे,बाळासाहेब तनपुरे,पर्यवेक्षिका उज्वला सिनगारे,सुधाकर बनकर,राजेंद्र गायकवाड, गुलाब पटेल,दिपक चव्हाण, शिवाजी बडाख,रामदास बोरगे,भगवती पटारे,अशोक मतकर,चंद्रकांत जोर्वेकर, दिपाली आंबेकर,अरविंद डोंगरे,ग्रंथालय प्रमुख सोमनाथ पटारे,महेश कोल्हे,विजय माळी,योगेश वायळ,गजानन पारे,विजय कोकणी,शुभम शेलार,गोरक्षनाथ शिंदे,रभाजी नान्नोर,प्रशांत देशमुख,सागर वायखिंडे,राहुल लासुरकर, लेखनिक गोरक्षनाथ दहिमिवाळ उपस्थित होते.सांस्कृतिक विभागाने या कार्यक्रमाचं अतिशय सुंदर आयोजन-नियोजन केलेलं होतं.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश उखर्डे यांनी केले आणि राजेंद्र धरम यांनी आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here