चड्डी मोर्चाची कामगार मंत्र्यांनी घेतली दखल, बेकायदेशीर कामे व कंत्राट पद्धत होणार रद्द

61

कंपनीतील बेकायदेशीर कामे व कंत्राट पद्धत रद्द करण्यासाठी सर्व कागदपत्र सादर करण्याचे कामगार आयुक्तांना आदेश

नाशिक प्रतिनिधी, ज्ञानेश्वर तुपसुंदर

नाशिक येथून ०२ जून रोजी कामगार आयुक्त कार्यालय नाशिक ते मुंबई मंत्रालय पर्यंत मार्शल संघटित व असंघटित कामगार युनियनचे शेकडो कामगार यांनी ट्रॅक कंपोनंट कंपनी विरोधात पायी चड्डी मोर्चा काढला होता. हा पायी मोर्चा पाच दिवसांनी मंत्रालय कडे जात असताना पोलिसांनी हा मोर्चा अडवला व मोर्चेकर्‍यांना पोलिसांनी गाडीत बसून आझाद मैदानापर्यंत नेऊन सोडले. त्यानंतर मोर्चेकऱ्यानी आझाद मैदानावर ठीया दिला व जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही असे मार्शल कामगार युनियनचे अध्यक्ष प्रशांत खरात यांनी सांगितले. 

तब्बल पंधरा दिवसानंतर त्या मोर्चाची दखल घेत युनियनचे अध्यक्ष व कामगार यांना आज दि: 17 जून रोजी कामगार मंत्री आकाश पुंडकर यांनी भेटीसाठी पाचारण केले, त्यानंतर कामगारांच्या मागण्या ऐकून घेतल्या त्यावर मंत्री म्हणाले की, कामगारांवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही, कायद्याची अंमलबजवणी न करणाऱ्या कंपन्यांची गय केली जाणार नाही, तसेच पुढील आठवड्यात ट्रॅक कंपनीचे मालक व कामगार सुरक्षा विभाग, कर्मचारी प्रोविजनल विभाग, ई.एस.आय.सी विभाग, एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी व कामगार आयुक यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले. 

तसेच कंपनीत चालु असलेले बेकादेशीर कामे व कंत्राट पद्धत कायमची रद्द करण्या करिता आवश्यक सर्व कागदपत्रे सादर करण्याचे आदेश कामगार आयुक्त व उपायुक्त यांना देण्यात आले.