अकोल्यात खळबळ: भावाने केला मोबाईलच्या हेडफोनसाठी लहान बहिणीची हत्या.

✒️मुकेश चौधरी✒️
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
7507130263
अकोला,दि.18 जुलै:- अकोल्यातून एक खळबळजनक आणि समाज मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. एका तरुणाने अगदी क्षुल्लक कारणावरुन आपल्याच लहान बहिणीची अंत्यत क्रूर पद्धतीने हत्या केल्याच्या घटनेमुळे संपूर्ण अकोला शहर हादरलं आहे. एक भाऊ आपल्या हाताला राखी बांधणा-या लहान बहिणीची निघृणपणे हत्या कशी करु शकतो? असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात आहे.

या घटनेवर अकोला शहरात मोठ्या प्रमाणात संताप दिसत होता. आपल्याच बहिणीची अशी निर्दयपणे हत्या करणा-या नराधम भावाला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी काही नागरीक आता करु लागले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, अकोला येथे राहणा-या यादव परिवारात बहिण-भावाच्या प्रवीत्र नात्याला काळीमा फासणारी ही घटना आहे. 19 वर्षीय नेहा नंदनलाल यादव असं मृतक बहिणीच नाव आहे. तर 24 वर्षीय ऋषिकेश उर्फ बॉबी राममोहन यादव असं मारेकरी भावाचं नाव आहे. बॉबी आणि नेहा या दोघांमध्ये आज (17 जुलै) सायंकाळच्या सुमारास मोबाईलच्या हेडफोनवरुन वाद झाला. या दरम्यान, बॉबीनं नेहाच्या गळ्यावर चाकूने वार करून तिला गंभीर जखमी केले. नेहाच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्ताचा धारा लागल्या होत्या. मुलीची आरडाओरड पाहता शेजाऱ्यांनी लागलीचं घटनास्थळ गाठले. जखमी नेहाला उपचारार्थ रुग्णालयात रवाना केले. मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला. दरम्यान, आरोपी बॉबी यादव हा मृतक नेहाचा आतेभाऊ असून सध्या त्याला खदान पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तरीही हत्येच मूळ कारण अद्यापही कळू शकले नसून पुढील तपास पोलीस करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here