साप्ताहिक श्रमिकचे कार्यकारी संपादक तथा जेष्ठ पत्रकार अनिल कडू यांचा ६१ वा वाढदिवस साजरा.
साप्ताहिक श्रमिकचे कार्यकारी संपादक तथा जेष्ठ पत्रकार अनिल कडू यांचा ६१ वा वाढदिवस साजरा.

साप्ताहिक श्रमिकचे कार्यकारी संपादक तथा जेष्ठ पत्रकार अनिल कडू यांचा ६१ वा वाढदिवस साजरा.

साप्ताहिक श्रमिकचे कार्यकारी संपादक तथा जेष्ठ पत्रकार अनिल कडू यांचा ६१ वा वाढदिवस साजरा.
साप्ताहिक श्रमिकचे कार्यकारी संपादक तथा जेष्ठ पत्रकार अनिल कडू यांचा ६१ वा वाढदिवस साजरा.

मुकेश चौधरी✒
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
7507130263
हिंगणघाट,दि.17 जुलै:- साप्ताहिक श्रमिक चे कार्यकारी संपादक तथा जेष्ठ पत्रकार अनिल विठ्ठलराव कडू यांचा ६१ वा वाढदिवसाच्या निमित्ताने एक छोटेखानी कार्यक्रम भारतीय युवा संस्कार परीषद व हिंगणघाट-समुद्रपुर पत्रकार संघाचे संयुक्त विद्यमाने अभिनव स्वदेशी वस्तू केन्द्र, श्रध्दा बिझीप्लेक्स, मृगनयनी इन्फ्रास्ट्रक्चर येथिल भारतीय युवा संस्कार परीषद कार्यालयात जेष्ठ पत्रकार तथा यादगार व्यायाम शाळेचे अध्यक्ष विजय राठी यांचे अध्यक्षतेखाली, युवा-संस्कार मासिकाचे संपादक प्रदीपकुमार नागपुरकर, रमेश लोंढे, वर्धमान अर्बन सहकारी बँकेचे मँनेजर कैलास व्यास, संजय अग्रवाल यांचे प्रमुख उपस्थितीत शनिवारला दुपारी २:०० वाजता कोरोना प्रादुर्भावाचे नियम पाळीत आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाचे सुरुवातीला दीप प्रज्वलन करुन मंगलगान, मंत्र पठन करुन अनिल कडू यांना शाल,श्रीफळ, भेटवस्तू, पुष्पगुच्छ देऊन ६१ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी मनोगत व्यक्त करतांना अनिल कडू म्हणाले कि आज मी ख-या अर्थाने जबाबदारी युक्त जाणीवेचा माणुस झालो आहे हा विचार देणारा हा वाढदिवस समजतो. तर प्रसंगवश विचार मांडतांना प्रदीपकुमार नागपुरकर यांनी अनिल कडू यांच्या लेखन तथा पत्रकारीतेतील कडू-गोड अनुभवात्मक माहितीच्या आधारे जीवनपटल उलघडले व त्यांनी अधिक जोमाने समाजासाठी आपल्या लेखनीच्या माध्यमातून समाज जागृती करावी असे मत मांडले, यावेळी अध्यक्षीय उद्बोधन करतांना विजय राठी यांनी कडू यांच्या ६१ व्या निमित्त त्याच्यांतील हजारी-जबाबी बाणा कसा असतो ते सांगित सयंम तथा प्रसंगानुकूल लेखनीच्या प्रहाराला धार कशी असते हे कडूच आहे पण सत्य आहे हा विनोदात्मक त्यांच्यातील भाव विशद केला.

याप्रसंगी मिडिया वार्ता न्यूजचे विदर्भ ब्युरो चीफ मुकेश चौधरी, सुरेंद्र बोरकर, इकबाल पहेलवान, अब्दुल कदीर बख्श, प्रमोद जुमडे, प्रशांत जगताप, आशिष अंबादे,राजु खांडरे, आमीन शेख, आदी पत्रकारासह भा.युवा संस्कार परीषदेचे चेतन काळे, कु. अरुधंति बगमारे, ऐश्वर्या वहादुरे, शरद बेलखेडे, धर्मेन्द्र ढगे, विवेक कांबले, ईश्वरी बगमारे, सौ. मोनाली काळे, संतोषी ढगे, अंकित दारुंडे आदीची उपस्थिति होती. कार्यक्रमाचे संचालन राजु खांडरे तर आभार प्रदर्शन अब्दुल कदीर बख्श यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here