भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणाच्या सुवर्ण महोत्सवी* *वर्धापन दिन साजरा*

*भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणाच्या सुवर्ण महोत्सवी*

*वर्धापन दिन साजरा*

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणाच्या सुवर्ण महोत्सवी* *वर्धापन दिन साजरा*
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणाच्या सुवर्ण महोत्सवी*
*वर्धापन दिन साजरा*

मनोज खोब्रागडे✍
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यु-8208166961

बुलडाणा, (जिमाका) :- भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचा दिनांक 16 जुलै 2021 रोजी सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन साजरा करण्यात आला. सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त या कार्यालयामार्फत विविध कार्यक्रम तसेच वेबिनारस चे आयोजन करण्यात आले. वेबिनार मार्फत जल साक्षरता अभियान सर्व स्तरावर पोहचविण्यासाठी गट विकास अधिकारी, तहसीलदार, सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, जलसुरक्षक, भूगोल व भुगर्भशास्त्र विषयाचे विदयार्थी तसेच राष्ट्रीय सेवा सुरक्षा दल/नेहरु युवा केंद्राचे विदयार्थी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, व शेतकारी यांना यु-टयूबवर वेबिनार, झुम ऑप याच्या माध्यमातून जल साक्षरता, भूजलाचे पुनर्भरण, पाण्याचा ताळेबंद, भूजल अधिनियम कायदा व त्यांचे विनियमण या संबंधी सर्व माहिती देण्यात आली.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनाच्या निमित्याने जिल्हाधिकारी एस.रामामुर्ती, तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष मनीषाताई पवार , जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांना भेट देवून विभागातर्फे पुष्पगुच्छ देण्यात आले. सर्व सन्माननिय पदाधिकारी/अधिकारी यांनी यंत्रणेस भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .
या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिना निमित्त या कार्यालयातुन सेवा निवृत्त झालेले अधिकारी व कर्मचारी यांना अमंत्रीत करुन पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा देण्यात आल्या.सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन वरिष्ठ भूवैज्ञानिक विश्वास वालदे, यांचे मार्गदर्शनानुसार करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ए.डी.मंगरुळकर, सहाय्यक भूवैज्ञानिक, श्रीमती. पाटील, कनिष्ठ भूवैज्ञानिक, एस.एन. डव्हळे, कनिष्ठ भूवैज्ञानिक व श्रीमती. एस.जी बैनाडे, कनिष्ठ भूवैज्ञानिक तसेच इतर कर्मचारी वर्ग यांनी प्रयत्न केले.
********