चंद्रपुर जिल्हात घडल दुहेरी हत्याकांड, किरकोर भांडणातून सुनेची आणि पत्नीची हत्या.

सौ. हनिशा दुधे✒
 बल्लारपुर तालुका प्रतिनिधि

चंद्रपूर/बल्लारपुर,दि.18 जुलै:- चंद्रपुर जिल्हातील बल्लारपूर शहर दुहेरी हत्याकांडाने हादळल आहे. कैंन्सरने ग्रस्त असलेल्या पत्नीची काळजी घेण्यावरून सुनेशी वाद झाला. या वादाचे परीवसन सुनेच्या आणि पत्नीच्या हत्याकाडात झाली. आपल्या सुनेची आणि पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी स्वस्ता पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पोलिसाचा स्वाधीन झाला.

कैंन्सरच्या आजाराने ग्रस्त असलेल्या आजारी पत्नीची आशाची काळजी घेण्यात सुनेने हयगय केल्याचा राग मनात धरुन शहरातील शिवाजी वार्डात राहणाऱ्या काजल डे वय 58 वर्ष यांची पत्नी आशाची सून प्रियंका ही व्यवस्थित देखभाल करत नसल्याने घरात अधूनमधून वाद होत होते. घटना घडली त्या दिवशी आरोपी काजल आपले काम आटोपून घरी आला होता. त्यावेळी त्याने आजारी पत्नी आशाला जेवण दिले का? अशी विचारणा सुन प्रियंकाला केली. त्यावर “वेळ मिळेल तेव्हा देईन” असे उत्तर सुनेने दिले. त्यावरून आरोपी आणि त्याच्या सुनेमध्ये भांडणाला सुरुवात झाली. हे भांडण विकोपाला गेल्यानंतर आरोपी काजल याने सुन प्रियंका हिचा गळा आवळून हत्या केली.

आपण आपल्या सुनेची हत्या केली या गुन्ह्यासाठी आपल्याला शिक्षा होणार हे लक्षात आल्यानंतर आरोपी काजल डे ने आपल्या आजारी पत्नी आशाची काळजी वाटू लागली. आपण जेलात गेल्यावर आपल्या पश्चात आजारी पत्नीची देखभाल कशी होणार, ही चिंता सतावल्यानंतर त्याने मरणासन्न अवस्थेत असलेल्या आपला पत्नी आशाचा गळा आवळून खून केला. नंतर त्याच स्थितीत काजल डे याने बल्लारपूर पोलीस स्टेशन गाठले व आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी गाठत दोघींनाही रुग्णालयात नेले. मात्र पत्नीचा आधीच मृत्यू झाला होता तर रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही तासांनी सुनेचाही मृत्यू झाला. आरोपी काजल डे याला अटक करून बल्लारपूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here