दहावीच्या निकालात इन्फट कान्वेंटच्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी.
दहावीच्या निकालात इन्फट कान्वेंटच्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी.

दहावीच्या निकालात इन्फट कान्वेंटच्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी.

दहावीच्या निकालात इन्फट कान्वेंटच्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी.
दहावीच्या निकालात इन्फट कान्वेंटच्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी.

संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

राजुरा :– दिनांक १६ जुलै २०२१ रोजी इयत्ता दहावी स्टेट बोर्डाच्या जाहीर झालेल्या निकालात इन्फट जिसस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुराच्या विद्यार्थ्यांनी भरीव कामगिरी करीत बाजी मारली आहे. इयत्ता १० वी ( स्टेट बोर्ड) च्या या वर्षीच्या निकालात पुन्हा एकदा १०० टक्के निकाल देण्याची परंपरा इन्फटने कायम राखली आहे.
यात कु. हिमांशी निवलकर आणि कु. तिशा भगत या दोघींनी ९६ % घेऊन इन्फट कान्वेंट मधून संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर कु. पुनम जेऊरकर ९५ % आणि कु. स्नेहा झाडे ९१ % यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला आहे. याशिवाय रोहन चांदेकर व लोकेश झाडे ९०.८ %, वर्धा देशकर ९०. ६ लोकेश बावणथडे ९०.४ %, संकल्प जुलमे ८९.८ %, विशाखा कायडींगे ८८.६ % आदींनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शैक्षणिक सत्र सन २०२०-२०२१ या वर्षी इयत्ता दहावी स्टेटच्या परिक्षेसाठी एकूण ६२ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यापैकी सर्व ६२ विद्यार्थी उत्तम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे एकूण ३६ विद्यार्थी डिस्टींक्शन मध्ये तर २४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर २ विद्यार्थी द्वितीय क्षेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यार्थ्यांच्या या कामगिरी व यशाबद्दल विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी वृंदांचे आमदार तथा इन्फट जिसस सोसायटीचे अध्यक्ष सुभाष धोटे, नगराध्यक्ष तथा संस्थेचे सचिव अरुण धोटे, शाळेचे संचालक अभिजित धोटे, रामचंद्रराव धोटे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रफुल्ल शेंडे, प्राचार्य समीर पठाण, स्टेट शाखेच्या मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, सीबीएसई शाखेच्या मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापक रफिक अन्सारी, आदींनी अभिनंदन केले आहे. तद्वतच शाळेच्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग आणि परिसरातील नागरिकांकडून यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षांव होत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here