वर्धा जिल्हातील कांनगाव कृषी उपबाजार समिती बनली अवैध रेती तस्करीचा गड.

वर्धा जिल्हातील कांनगाव कृषी उपबाजार समिती बनली अवैध रेती तस्करीचा गड.

वर्धा जिल्हातील कांनगाव कृषी उपबाजार समिती बनली अवैध रेती तस्करीचा गड.
वर्धा जिल्हातील कांनगाव कृषी उपबाजार समिती बनली अवैध रेती तस्करीचा गड.

✒मुकेश चौधरी✒
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
7507130263
वर्धा,दि.17 जुलै:- वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात “रेती घाटाचीच” अक्षरश: चोरी होत असल्याने शासकीय कर्मचारी रेती माफियांच्या वेसणीला बांधलेले आहेत का? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. सदर अवैध रेती तस्करी ही चक्क कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजाराचे शासकीय जागेवरून होत असेल तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती तसेच संचालक मंडळाला झोपेतुन जागे कोण करणार यावर मोठे प्रश्न चिन्ह लागले आहे.

हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत येणा-या कांनगाव उप कृषी बाजार समितीतील शासकीय जागेची अवैध रेती तस्करी आणि साठवणुक करण्यासाठी वापर करण्यात येत असल्याची माहिती समोर आली असता मिडिया वार्ता न्यूजचे प्रतिनिधीने घटना स्थळी भेट देऊन शहानिशा केली. हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत येणा-या कांनगाव उप कृषी बाजार समिती चे आवारात दिड ते दोन एकर परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध रेतीची साठवणुक करुन ठेवली आहे अशी माहिती समोर आली आहे.

वर्धा जिल्हातील हिंगणघाट तालुक्यात शासनाचा लाखो रुपयांचा महसूल चोर-चोर,भाऊ भाऊ वाटून खाऊ या उक्तिनुसार रेती तस्करी कारभार चालला तर नाही ना? लाखो रुपयांच्या या अवैध रेती तस्करी आणि साठेबाजीतील महसुलाचे भागीदार आहेत तरी किती हा संशोधनाचा विषय आहे.

उपबाजार समितीची जागा अवैध धंदयासाठी.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा असल्याने हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजारचे सभापती तसेच संचालक मंडळाच्या आशिर्वाद असल्याशिवाय हे शक्य नाही. अवैध रेती तस्करी करुन इतक्या मोठ्या प्रमाणावर साठा असून सुध्दा याकडे लक्ष का दिले जात नाही, की जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. प्रशासनातील अधिकारी आपल्या अंगावर बितेल या भीतीपोटी दुर्लक्ष करतात की इतर काही. मात्र यावेळी शासनाचा कोरोडोचा महसूल बुडत असताना देखील महसुल अधिकारी,पोलिस यंत्रणा तसेच खनिकर्म विभाग झोपेत आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

4 ते 5 ट्रलर दिवस रात्र करत आहे रेती वाहतुक.
इतक्या मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा करुन दिवस रात्र रेतीचे उत्खनन करून ट्रॅक्टर,ट्रलर हायवाच्या मध्यमातून रेतीची शासकीय कामावर व नवीन प्लँटवर रेती टाकली जात आहे. महसूल विभागाचे काही भ्रष्ट वरिष्ठ अधिकारीवर्गाशी हातमिळवणी करून रेती तस्कर मालामाल होत आहेत. याठिकाणी सामान्य कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला मातीची गरज लागली तर त्याच्या वाहनावर महसूल विभागाच्या वतीने दंडात्मक कारवाई केली जाते. परंतु हे रेतीतस्कर सर्वच गौणखनिजांची बिनबोभाट विल्हेवाट लावित आहेत, हे खरे