नागपूर जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकारणीची सभा संपन्न.

50

नागपूर जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकारणीची सभा संपन्न.

नागपूर जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकारणीची सभा संपन्न.
नागपूर जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकारणीची सभा संपन्न.

✒️युवराज मेश्राम✒️ 

नागपूर जिल्हा प्रतिनिधी

9527526914

नागपूर,दि.18 जुलै:- नागपुर येथे राष्ट्रवादी काँग्रेस नागपूर जिल्हा ग्रामीण विभागाच्या वतीने नुकतीच कार्यकारणीची बैठक जिल्हा अध्यक्ष शिवराज बाबा गुजर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात आयोजन करण्यात आली होती. माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल प्रमुख्याने उपस्थित होते. यावेळी नुकतेच पक्षप्रवेश केलेले माजी केंद्रीय मंत्री श्री सुबोध मोहिते यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

 

या बैठकीत नागपूर जिल्ह्यातील सर्व तालुका विधानसभा अध्यक्ष आणि महिलांनी पक्ष कार्यालयात तालुका निहाय अहवाल सादर करून तालुक्यातील विविध समस्या व येणाऱ्या काळात संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करून शेतकरी शेतमजूर वंचित समाजाचे प्रश्न घेऊन त्यांचे निराकरण करण्याचे अभिवचन उपस्थितांना दिले.

 

जिल्हा परिषद, नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकीत पक्षाचे जास्तीत उमेदवार निवडून येण्यासाठी सामान्य लोकांच्या समस्या जाणून सोडवण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत व पक्ष विस्तार करण्यासाठी लोकांना पक्षाच्या विचारधारेत आणून पक्ष संघटना मजबूत करावे असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी केले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माजी केंद्रीय उद्योग मंत्री सुबोध मोहिते, दीवाना पडोळे, राजेंद्र जैन, प्रकाश गजभिये, बाबा गुजर, सलील देशमुख, दिनेश्वर पेठे, प्रशांत पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र सचिव अविनाश गोतमारे, प्रवीण कुंठे, गंगाप्रसाद बन्सी, महिला आघाडीच्या अध्यक्षा अर्चना हाडे, राजू राऊत, राजाभाऊ ताकसांडे, अहमद भाई शेख, जिल्हा परिषद सदस्य बंडोपंत उमरकर, राजाभाऊ आखरे, सतीश शिंदे, किशोर बेलसरे, अविनाश आवळे, कैलास बोरकर, चंद्रशेखर चिखले, शेखर कोले, अविनाश डोंगरे, अविनाश पाटील, विलास मूर्ती, श्याम मंडपे, आकाश गजभिये, कुंडलिक राऊत, संतोष नरवाडे, अमर मुखाचे, धनराज कपडे, विशालगार्ड बैल, चंद्रशेखर कोल्हे, अरविंद साळवे, सुधाकर तीबोले, गंगाधर होंगे, विलास कांबळे, रवी शेंडे, चंद्रशेखर चिखले, प्रभू अंबुरे, भुजंग मोज, युवराज मेश्राम, प्रभू आंबोरे, सत्यजीत शर्मा व जिल्ह्यातील बहुसंख्य राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.