राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते -किणी-गुडसुर-घोणसी रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरण कामाचे भूमिपूजन*

*राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते -किणी-गुडसुर-घोणसी रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरण कामाचे भूमिपूजन*

राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते -किणी-गुडसुर-घोणसी रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरण कामाचे भूमिपूजन*
राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते -किणी-गुडसुर-घोणसी रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरण कामाचे भूमिपूजन*

मनोज खोब्रागडे✍
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यू-8208166961

लातूर(जिमाका) :-किणी-येल्लादेवी- वाढवणा पाटी-वाढवणा-गुडसुर-घोणसी या रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण या कामाचे भूमिपूजन राज्याचे संसदीय कार्य, पर्यावरण, भूकंप पुनर्वसन, पाणीपुरवठा व स्वच्छता, रोजगार हमी योजना राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते आज घोणसी ता. जळकोट येथे झाले.
यावेळी राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, या रस्त्याच्या रुंदीकरण, नूतनीकरण व मजबुतीकरणाचे काम शासनाने ठरवून दिलेल्या वेळेत संबंधित गुत्तेदाराने पूर्ण करून या भागातील नागरिकांना दिलासा द्यावा. कोणत्याही परिस्थितीत विहित कालमर्यादेत हे काम झाले पाहिजे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कामाचे योग्य ते नियंत्रण ठेवावे. तसेच हे काम ठरवून दिलेल्या गतीने व गुणवंता पुरक दृष्ट्या योग्य होत असल्याचे वेळोवेळी खात्री करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
किनी येल्लादेवी, वाढवणा पाटी, वाढवणा गुडसुर घोणसी या रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी चार कोटी तर मजबुतीकरणासाठी साडेतीन कोटी रुपये माहे मार्च 2020अर्थ संकल्पात मंजूर केलेले होते. त्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामासाठी तांत्रिक मंजुरी दिली असून ही कामे वेळेत करण्यात येतील, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कांडलीकर यांनी यावेळी सांगितले.
उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सिद्घेश्वर पाटील, जळकोट राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका आगलावे मामा, जळकोट काँग्रेसचे तालुका अघ्यक्ष मारूती पांडे, उदगीर तालुका काँग्रेसचे अघ्यक्ष कल्याण पाटील,प्रा .शाम ढावळे बाळासाहेब मारापल्ले,माधव कांबळे उदगीर तहसीलदार रामेश्वर गोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लातूर 2 चे कार्यकारी अभियंता श्री मधुसुदन कांडलीकर, उप अभियंता श्री. देवकर यांच्यासह अन्य मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.