अशोकदादा साबळे विद्यालयात पालक-शिक्षक संघ स्थापनेसाठी सभा संपन्न

सचिन पवार

माणगांव तालुका प्रतिनिधी

मो: ८०८००९२३०१

माणगांव :- रायगड जिल्ह्यातील माणगांव मधील नामांकित विद्यालय म्हणून अशोक दादा साबळे विद्यालयाची ओळख आहे या शाळेत शेक्षणिक वर्ष सण २२/२३ या वर्षाची पालक शिक्षक सभा दि १६ जुलै २२ रोजी आयोजित करण्यात आली होती या सभेला पालकाचा उदंड असा प्रतिसाद होता सदर सभेला पालक वर्ग व मान्यवराचा प्रथमतः स्वागत करण्यात आलं.

शाळेचे मुख्याध्यापक श्री डी एम जाधव सर यांनी पालक शिक्षक संघ याचा उद्देश या सघाचे कर्त्यव्य याबाबत सर्वांना अवगत केले शाळेच्या शेक्षणिक कार्याचा आढावा घेऊन या वर्षात राबविणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती पालकांना दिली या सभेत पालकांनी काही महत्वाच्या सूचना केल्या अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात खूप उत्साहत विद्याथ्याच्या सर्वांगीन विकासासाठी एकत्र येऊन काम करण्याचा सर्वानी निर्धार व्यक्त केला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री डी एस उभारे सर यांनी केले सभेमध्ये पालक शिक्षक संघ गटीत करण्यात आला पालक शिक्षक संघ कार्यकारी पुढील प्रमाणे अध्यक्ष मुख्याध्यापक डि एम जाधव सर, उपाध्यक्ष चेतन गव्हाणकर, सचिव डि एस उभारेसर, सह सचिव रवी किरण पालवे सर इयत्ता पाचवी ते दहावी वर्गाच्या प्रत्येक तुकडीचे एक पालक व एक शिक्षक याप्रमाणे समिती गटीत करण्यात आली या सभेसाठी माणगांव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ऍड श्री राजीव जी साबळे, संस्थेचे जेष्ठ संचालक मा. नरेंद्र शेठ गायकवाड, व नितीन शेठ बामुगडे हे या सभेला उपस्थित होते.

या सभेला संस्थाचालकांनी ही सबोधित केले मागील अनेक वर्षापासूनचा पालकाचा उपस्थितीचा सर्व विक्रम यावर्षी मोडला गेला.या सभेची सांगता श्री डि एस उभारे सर व अशोकदादा साबळे विद्यालय चे मुख्याध्यापक श्री डि एम जाधव सर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here