महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा, अलर्ट जाहीर

46

महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा, अलर्ट जाहीर

रितेश गाडेकर

मंगरूळपीर शहर प्रमुख

मो: 8698143534

राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही भागात नदी नाल्यांना पूर आला आहे. दरम्यान, या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सरकारने जनतेला सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

मुंबई, ठाणे, पालघर, कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.संततधार पावसामुळे कोल्हापुरातील भोगावती नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने कसबा बीड ते माहेपर्यंतचे पाणी धरणापर्यंत पोहोचले आहे. नदीकाठच्या शेतीलाही पुराचा फटका बसला आहे. नकाशा मध्ये जे जिल्हे नारंगी, पिवळा आणि लाल कलर मध्ये दिलेल्या आहेत, त्या जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट चा इशारा.

चार दिवसांपूर्वीपासून संततधार पाऊस सुरू असून, त्यामुळे सिंदखेडराजाच्या प्रसिद्ध चांदणी तलावाची भिंत खचली आहे. ऐतिहासिक सिंदखेडराजा शहरात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे या रामेश्वर मंदिराच्या भिंतीला तडे गेले, तसेच चांदणी तलावाची भिंत, जी आता प्रसिद्ध आहे. त्यामुळे अशीच एक पुरातन वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची चिंता स्थानिकांनी व्यक्त केली असून पुरातत्व खात्याने याकडे तातडीने लक्ष देण्याची विनंती केली आहे.