कामगार महिलांचे प्रमाण घटण्याची शक्यता

वाशिम जिल्हा प्रतिनिधी

अजय उत्तम पडघान

मो: 7350050548

वाशिम: अधुनिक काळात महिलांसामोर अनेक समस्या आहेत. खासगी कामामध्ये महिलांना मजुरी कमी तर पुरुषांना महिलांपेक्षा जास्त मजुरी दिली जाते. तसेच कामावरील महिलांकडे वाईट उदेशाने बघण्याचा अनेकांचा कल असतो. यासह अनेक विविध समस्यांमुळे कामगार महिलांचे प्रमाण घटण्याची शक्यता आहे. यासाठी महिला-पुरुषांना समान मजुरी देणे महत्वाचे आहे. तसेच समाजाने महिलांना मानसन्मान देऊन बघण्याचा उदेश बद्दलण्याची गरज आहे, असे आवाहन भाजपा महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सौ ममता शर्मा यांनी केले आहे.

कामगार महिलांचा प्रश्न गंभीर असून कामगार महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे कामगार महिलांचे प्रमाण घटले आहे. याची अनेक कारणे आहेत. शहरी महिलांना कामाच्या ठिकाणची सुरक्षितता आणि लैंगिक अत्याचाराच्या घटना आदी गोष्टींची भीती वाटते. तर ग्रामीण भागातील महिलांना संसाराचा गाडा हाकलतानाच, घरातून बाहेर पडणे कठीण जाते, कारण त्यांना घरातूनच तितका पाठिंबा मिळत नाही किंवा मदत मिळत नाही. बांधकामाच्या ठिकाणी कामगार महिलांना त्यांच्या मुलांना सांभाळण्यासाठी संगोपन केंद्रे सुरू केली किंवा तशा सुविधा दिल्या तर, या महिला मोठ्या संख्येने या क्षेत्रात येण्यास सक्षम होतील.

कृषी क्षेत्रात महिला कामगारांचा सहभाग वाढवायचा असेल तर, शेतीच्या कामासाठी त्यांना समान मजुरी देणे अवश्यकता आहे. असे त्यांनी सांगितले आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा महत्वाचा!

मालक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कापड कारखान्यातील कामगारांना खूपच कमी पैसे देतात. या गोष्टीला प्रोत्साहन न देता, त्याऐवजी चांगली उपकरणे, साधने आणि कामाच्या परिस्थितीत सुधारणा करून उत्पादन वाढवण्यावर भर दिला पाहिजे.

कामगार महिलांच्या वसतिगृहांची संख्या वाढवली पाहिजे. महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा महत्वाचा आहे. ग्रामीण भागातील महिला अत्याचार आणि विनय भंगासारख्या घटनांच्या विळख्यात सापडल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here