शिवसेनेचे पदाधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर गेले…!

53

शिवसेनेचे पदाधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर गेले…! शेतकऱ्यांचे व्यथा जाणुन घेतले, धान रोवणीला केली मदत

मारोती काबंऴे

गडचीरोली जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी

मो: 9405720593

मुलचेरा:- नुकतेच शिवसेना प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विदर्भाचा दौरा करून नागपुर येथे विदर्भातील पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी यांचे आढावा बैठक घेऊन शेतकऱ्यांचे समस्या व पक्ष संघटन वाढीसाठी सूचना केले. त्याच अनुषंगाने शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख महेश केदारी व अहेरी विधानसभा संपर्क प्रमुख शिवाजी पाटील यांच्या मार्गदर्शना खाली शिवसेना पक्षाचे अहेरी जिल्हा प्रमुख रियाज शेख हे पक्षाचे पदाधिकारी यांच्या समवेत सोमवार 17 जुलै रोजी मुलचेरा तालुक्याचा दौरा करून थेटरियाज शेख़ यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले आणि प्रश्न व समस्या जाणून घेतल्या.

     मुलचेरा तालुक्यातील भवानीपुर येथील शेतांमध्ये पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी थेट शेतात जाऊन धान रोवणी करिता शेतकऱ्यांची मदत व हातभार लावून शिवसेना पक्ष हे शेतकरी, कष्टकरी, कामगार,मजूर, गोर-गरीबांचे हित साधनारा पक्ष असल्याचे दाखवून दिले.

     शिवसेनेचे अहेरी जिल्हा प्रमुख रियाज शेख यांनी असंख्य शेतकऱ्यांसोबत हितगुज करुण व शेतकऱ्यांचे समस्या जाणून घेऊन शेतकऱ्यांचे समस्या व प्रश्न मार्गी लावन्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना पक्ष सदैव कटिबद्ध असल्याचे बोलून दाखविले.

    त्या नंतर शिवसेना पक्षाचे मुलचेरा तालुका प्रमुख नीलकमल मंडल यांच्या निवासस्थानी पक्षाचे आढावा बैठक घेण्यात आले. बैठकीत जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण निहाय चर्चा करुण बूथ व पक्ष संघटन मजबूत करुण पक्षाचे ध्येय-धोरणे व विचार प्रत्येक घराघरात पोहचवावे असे आवाहन शिवसेनेचे अहेरी जिल्हा प्रमुख रियाज शेख यांनी केले.

     यावेळी तालुका प्रमुख नीलकमल मंडल, ग्रामीणचे संजय मंडल, अहेरी शहर प्रमुख अयान पठाण, मुकेश ठाकुर, माजी सरपंच तथा विभाग प्रमुख बाबुल माधवदास, सत्यम सरकार, दीपिका मंडल, मंजू मंडल, सुजाता बिश्वास, निकिता मंडल,दिलीप बिश्वास, नकुल मंडल, राबिन बिश्वास आदी पदाधिकारी व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.