न्यू प्रगती शैक्षणिक संस्थेचे संस्थापक काल. दिनकर लक्ष्मण खरात (अण्णा) यांचा द्वितीय स्मृतिदिन साजरा
ठाणे: न्यू प्रगती शैक्षणिक संस्था (रजि.) चे संस्थापक काल. दिनकर लक्ष्मण खरात (अण्णा) यांचा द्वितीय स्मृतिदिन भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजक खरात कुटुंब त्याचप्रमाणे पदाधिकारी होते. या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, परिसरातील नागरिक आणि विशेषतः महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कार्यक्रमात संस्थेचे सहसचिव मा. महेश गडांकुश यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “बाबांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली नाही, पण त्यांनी स्थापन केलेली संस्था हीच त्यांची खरी ओळख आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी नुसते ‘शिका नाहीतर शिकवा’ हा संदेश दिला आणि त्या विचारांना अनुसरून खरात अण्णांनी ‘न्यू प्रगती शैक्षणिक संस्था’ स्थापन करून तो वसा जपला. आज त्यांची मुले – मा. अनिता खरात मॅडम आणि गणेश खरात – ही संस्था पुढे नेत आहेत, यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.”
त्यानंतर सामाजिक व राजकीय कार्यकर्त्या मा. सुरेखा गडांकुश यांनी आपल्या भाषणात नमूद केले, “आम्ही बाबांना प्रत्यक्ष पाहिलेले नाही, पण आज अनिता ताई ज्या तळमळीने कार्य करतात, त्यातूनच अण्णा कसे होते हे सहज दिसून येते.”
कार्यक्रमात बौद्धाचार्य मा. सोनवणे गुरूजी यांनी धम्मविधी व प्रवचन घेतले.
संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक मा. विजय काळे सर, खास बोरिवली वरून आलेले संस्थेचे सहसचिव महेश यांचे मित्र मा. अजित कदम हे सुध्दा उपस्थित होते तसेच अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
🏛️ संस्थेचे पदाधिकारी – न्यू प्रगती शैक्षणिक संस्था (रजि.):
🧑💼 अध्यक्ष: मा. गणेश खरात
🧑💼 सचिव: मा. अनिता दिनकर खरात
🧑💼 उपाध्यक्ष: मा. सुनील कांबळे
⚖️ खजिनदार: अॅड. चंद्रकांत सोनवणे
👩💼 सदस्य: मा. सुनीता सोनवणे
👩💼 सदस्य: मा. सारिका गडांकुश
👩💼 सदस्य: मा. विजय काळे
👩💼सदस्य: मा.सपना शिवमारे
👩💼 सदस्य: मा. शितल घाणेकर
—
कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्व पदाधिकारी, सदस्य व स्वयंसेवकांचे विशेष सहकार्य लाभले.
✊ बाबासाहेबांच्या विचारांची आणि शिक्षणक्रांतीची ज्योत संस्थेच्या माध्यमातून सतत प्रज्वलित राहो, हीच आदरांजली!