गृहनिर्माण संस्थेतील भूखंड हेराफेरी चा आरोप माजी नगराध्यक्ष फत्तेसिंग मरड वार वर फसवणुकीचा गुन्हा दाखल

✒️युवराज मेश्राम✒️
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
9923296442
नागपुर:- कळमेश्वर तालुक्यातील गृहनिर्माण संस्थेतील भूखंड विक्रीत हेरा फेरी केल्याप्रकरणी कळमेश्वर नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष फत्तेसिंग मरडवार यांच्याविरोधात कळमेश्वर पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधान आले आहे. अहमद हुसेन रहमतुल्ला शेख वय 41 वर्ष राहणार नागपूर यांनी ही तक्रार दाखल केली आहे
26 जुलै 1991 मध्ये ब्राह्मणी येथील नियोजित श्रमिक गृहनिर्माण संस्था तयार करण्यात आली होती, परंतु मुख्य प्रवर्तक असलेले फत्तेसिंग भालचंद मरडवार यांनी राहुल हरिषकुमार बिजलानी वय 55 वर्षे नागपूर यांनी मौजा 752 कचरा क्रमांक 287 नवीन 366 भूखंड क्रमांक 28 व 20 विक्री केली त्यानुसार 17 ऑगस्ट 1992 ला भूखंडाचा फेरफार करून सातबारा बनविण्यात आला तरी देखील भूखंड क्रमांक 28 अहमद व मनोज यांनी आममुख्यत धारक कयूम कादर शेख यांच्यापासून 14 फेब्रुवारी 2011 ला संयुक्तपणे खरेदी केली तर मनोज यांनी भूखंड क्रमांक वीस देखील या दिवशी खरेदी केला परंतु त्या भूखंडाचा फेरफार नोंदणी क्रमांक बाराशे 29 अंतर्गत झाल्यानंतर क्रमांक 28 मराठवाडा हा त्यांनी भूसंपादन अधिकारी यांची मिळून ऑनलाइन पद्धतीने भूखंड 28 व मनोज यांचा भूखंड क्रमांक 20 चा कुठल्याही प्रकारचा फेरफार न करता सातबारा उतारा आपल्या नावाने करून घेतला मर्डर वार हे लेआउट प्रमुख असताना त्यांनी बिजलानी यांना विकलेले भूखंड आपल्या नावाने करून महामार्गात गेलेल्या भूखंडाचे रक्कम 2018 मध्ये पाच लाख 74 हजार 488 रुपये व नंतर 2021 मध्ये 19 लाख 53 हजार रुपये स्वतः घेतल्याचा आरोप शेख यांनी केला केलेला आहे याप्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी मरड वार यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.