शेतकऱ्यांनो रानभाज्या मधून उत्पन्न वाढवा पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार कळमेश्वर येथे रानभाजी महोत्सव

शेतकऱ्यांनो रानभाज्या मधून उत्पन्न वाढवा पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार कळमेश्वर येथे रानभाजी महोत्सव

शेतकऱ्यांनो रानभाज्या मधून उत्पन्न वाढवा पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार कळमेश्वर येथे रानभाजी महोत्सव
शेतकऱ्यांनो रानभाज्या मधून उत्पन्न वाढवा पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार कळमेश्वर येथे रानभाजी महोत्सव

==मुख्य मुद्दे==
कळमेश्वर येथे रानभाजी महत्व सत्व याबद्ल माहिती दिली.

✒️युवराज मेश्राम✒️
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
9923296442
नागपुर/कळमेश्वर:- कळमेश्वर येथील तहसील कार्यालयात रानभाज्या महोत्सव प्रशासना तर्फे आयोजीत करण्यात आला होता. रानभाज्या आरोग्यासाठी चांगल्या असून त्यात मोठ्या प्रमाणात पोषकतत्व असतात ग्रामीण भागातील नागरिक यांचा आहारात समावेश करतात मात्र मात्र शहरी भागात यांचा उपयोग करणारे अल्प आहेत शेतकऱ्यांनी रानभाज्याचे उत्पादन घेऊन शहरी बाजारपेठेत उपलब्ध करून दिल्यास त्यांची रुची रानभाज्या मध्ये वाढेल व शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होईल त्यामुळे शेतकऱ्यांची रान बांधण्याचे उत्पादन द्यावे असा सल्ला राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिला.

कृषी विभागाच्या वतीने तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोर कुंभारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाबा पाटील, खरेदी-विक्री संस्थेचे अध्यक्ष बाबा कोडे, पंचायत समिती माजी सभापती श्रावण भिंगारे, उपसभापती जयश्री वाळके, जिल्हा परिषद अध्यक्ष महेंद्र डोंगरे, देवानंद कोडे, विजय भांगे, पिंकी कौरती, वंदना बुद्धाने, प्रभाकर भोसले, मालती वस्तू, यांची प्रमुख उपस्थिती असेल तर त्याच प्रमाणे उपविभागीय कृषी अधिकारी डॉक्टर डॉक्टर वाय एस जुमडे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते,

या रानभाजी महोत्सवाचे शेतकऱ्यांनी एकूण 75 स्टॉल लावले होते. यात सर्व स्टॉलला मंत्री केदार यांनी भेट दिली व त्याची माहिती जाणून घेतली या महोत्सवात शेवग्याची पाने व फुले अंबाडी भाजी, कुंजर भाजी, अर्वडा, करटोली, कडू नोंदींची पाने गुळवेल केना सुरण घोळ भाजी चोपडा माठ रानभेंडी शेवली भोई कोड बांबू वाजते रानकांदा चीवर तरोटा गावरान पपई भुईआवळा कट उंबर दोडका दोडका पाथरी रानतुळस वासनवेल गोपाळ कुंडी रान दोडके अशा एकूण 35 रानभाज्या ठेवण्यात आल्या होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष चेंबूरकर तर प्रस्ताविक तालुका कृषी अधिकारी उमाकांत हा दगडे यांनी केले तर आभार प्रदर्शन मंडळ कृषी अधिकारी जगदीश नरवाडे यांनी मानले.