वेकोली कर्मचाऱ्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल, युनियन पक्ष बदल केल्याने मारहाण केल्याचा आरोप
अश्विन गोडबोले
विशेष प्रतिनिधी
मो: 8830857351
चंद्रपूर ,18 ऑगस्ट: वेकोलीत गुरुवार 17 ऑगस्ट पासून युनियन व्हेरिफिकेशन च्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे अश्यातच चंद्रपूरातील दुर्गापूर रयतवारी कोलियरी येथे मारहाणीची घटना उघडकीस आली आहे.
फिर्यादी, दिपक चंपालाल सहारे (46) राहणार. दुर्गापूर रयतवारी कॉलरी हे वेकोलीला कार्यरत असून ते शुक्रवार 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास आपल्या मुलाला शिकवणी वर्गावरून परत घेऊन येत असताना दिपक नामदेव इखार (33) रा. दुर्गापूर रयतवारी कॉलयरी याने दिपक सहारे यांना रस्त्यात अडवून त्यांना अश्लील शिवीगाळ करून तू पक्ष का बदललास असा जाब विचारत वाद करत मारहाण केली तसेच दिपक यांचा मोबाईल हिसकावून जमिनीवर आपटून फोडला. दिपक ईखार याने एवढ्यावरच न थांबता दिपक साहारे यांना पुन्हा मारहाण करण्याची धमकी दिली. दिपक इखाऱ हा सुद्धा वेकोलीच्या दुर्गापूर रयतवारी खाणीत कार्यरत आहे. दिपक इखार याच्यावर भादंवीच्या कलम 294, 323, 427, 506 अन्वये मारहाण करणे, धमकावणे अश्या प्रकारच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. . फिर्यादी दिपक साहारे यांनी याबाबतची तक्रार रामनगर पोलिस ठाणे येथे केली
मारहाणीची ही घटना वेकोली युनियन व्हेरिफिकेशन निवडणुकीच्या दरम्यान घडली असल्याने वेकोली कर्मचारी युनियन वर्गात चर्चा व तणावाचे वातावरण आहे.
असून पुढील तपास, तपास अधिकारी महादेव खोब्रागडे करीत आहेत.