समुह निवासी शाळा एटापल्ली येथील इमारतीवरील छताचे तात्काळ दुरुस्ती करण्यात यावे अन्यथा शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाच्या वतीने आंदोलनाचा इशारा  

मारोती काबंऴे

गडचीरोली जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि

मो:9405720593

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली, मार्फत मा. गट विकास अधिकारी पंचायत समिती एटापल्ली यांना निवेदनाद्वारे देण्यात आले.

एटापल्ली:- मागील ४ महिन्यापासून वादळ वाऱ्याने समुह निवासी शाळा, एटापल्ली येथील दोन खोली इमारतीचे मागील बाजूचे छतावरील टीन पूर्णपणे उडून गेल्याने अजून पर्यंत त्या वर्ग खोली कडे स्थानिक अधिकार्यांचे संपूर्ण दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. ज्या वर्ग खोली मध्ये विद्यार्थी बसत होते, त्यांना दुसया इमारतीमध्ये स्थानांतर करण्यात आले परंतु त्या इमारतीमध्ये सुद्धा लिकेज असल्याने पावसाच वर्ग खोली मध्ये पानी पडत असते त्यामुळे विद्यार्थांना बसण्यास अडचण होत आहे.करीता तात्काळ दोन खोली असलेली इमारतीचे दुरुस्त करून विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आले अन्यथा शिवसेना (उ.बा.ठा.) पक्ष हे कदापी खपवून घेणार नाही तसेच या संपूर्ण बाबीकडे शासनाने लक्ष घालून तात्काळ या इमारतीचे दुरुस्तीकरण करण्यात यावे जर दुरुस्ती तात्काळ न केल्यास शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा सुद्धा निवेदनाद्वारे देण्यात आले.

निवेदन देताना उपस्थित श्री रियाज शेख शिवसेना (उ.बा.ठा.) जिल्हाप्रमुख अहेरी विधानसभा, मनीष दुर्गे शिवसेना (उ.बा.ठा.) तालुकाप्रमुख, अक्षय पुंगाटी युवासेना तालुका अधिकारी, नामदेव हिचामी नगरसेवक न.पं. एटापल्ली, सुजल वाघमारे युवासेना उप तालुका अधिकारी, आयान पठाण युवा शहर अधिकारी अहेरी, तेजस गुजलवार शाखाप्रमुख एटापल्ली तसेच कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here