महाराष्ट्रात नव्हे तर देशात पहिलीच घटना, महसूल विभागात १० दिवसात अनुकंपावर भरती
✍️मंगेश मेस्त्री ✍️
माणगांव तालुका प्रतिनिधी
📞99238 44308📞
माणगांव :-माणगाव तहसील कार्यालयातील महसूल कर्मचारी प्रदीप सोनावळे यांचे दिनांक ५ ऑगस्ट २०२३ रोजी अपघाती निधन झाले प्रदीप सोनावळे ड्युटीवर असताना अपघाती निधन झाले, त्यांच्या कुटुंबातील त्यांची मुलगी पूजा सोनावळे हिला अनुकंपा भरतीसाठी शासकीय खात्यात नोकरी मिळून देण्यासाठी माणगाव तहसीलदार यांनी माणगाव प्रांत अधिकारी संदिपान सानप यांच्याकडे पाठपुरावा केला, त्याने तात्काळ प्रतिसाद देऊन जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश म्हसे यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी पूजा सोनावळे हिला तलाठी पदावर अवघ्या दहा दिवसात नियुक्ती देण्यास परवानगी दिली.
पूजा सोनावळे / हिला १५ आगस्ट रोजी उपविभागीय प्रांत अधिकारी माणगाव यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रधान
माणगाव प्रांत कार्यालय समोर पोलीस परेड मैदानात 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाल्यानंतर पूजा सोनावळे हिला प्रांत अधिकारी संदिपान सानप यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले पूजा सोनाळे ला दहा दिवसात अनुकंपावर भरती मध्ये नियुक्तीचे आदेश मिळण्याची ही महाराष्ट्रात नव्हे तर देशातील पहिलीच घटना आहे, त्यामुळे माणगाव तालुक्यात तसेच महसूल खात्यात यांच्या या जलद कामगिरी सर्व स्तरातून कौतुक देखील होत आहे याप्रसंगी कै. प्रदीप सोनावळे यांचे कुटुंबीय माणगाव उपविभागीय प्रांत अधिकारी संदिपान सानप, माणगाव तहसीलदार विकास गारुडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कुमार पोंदूकुळे, माणगाव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, साळुंके रेस्क्यू टीमचे जिल्हाध्यक्ष प्रशांत साळुंखे, माणगावचे मुख्याधिकारी संतोष माळी, नगराध्यक्ष ज्ञानदेवजी ,पवार शासकीय खात्यातील अधिकारी, व कर्मचारी, लोकप्रतिनिधी, उपस्थित होते.