कोकण टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस प्रा. लि. तर्फे करिअर मार्गदर्शन व बक्षीस वितरण समारंभ
रायगड जिल्हा प्रतिनिधी
निलेश महाडिक
मो.7722040387
रायगड :- टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस प्रा. लि. यांच्या वतीने काल करिअर मार्गदर्शन व बक्षीस वितरणाचा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करिअरच्या विविध संधींवर चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून तबरेज गोईलकर, सहिम हवालदार, ए.पी.आय. संदीप काहळे साहेब, अब्दुल शाकूर घन्सार, समीर चौगुले आणि नबील काझी, शाहनवाज उकये यांची विशेष उपस्थिती लाभली.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी करिअर व रोजगाराच्या संधींबाबत थेट प्रश्न विचारले. पाहुण्यांनी संयमपूर्वक व सविस्तर उत्तरे देऊन विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक जगात दिशा दाखवली. या ओपन प्रश्नोत्तर सत्रामुळे विद्यार्थ्यांना करिअरविषयक महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.
कोकण टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस प्रा. लि.चा उद्देश म्हणजे विद्यार्थी व युवकांना आय.टी. कोडिंग क्षेत्रात मार्गदर्शन करून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम करणे हा आहे. म्हसळा परिसरात या संस्थेचे उल्लेखनीय कार्य सुरू असून, स्थानिक विद्यार्थ्यांना नव्या तंत्रज्ञानाची जोड मिळत आहे.
समारंभात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. यशामध्ये शिक्षक व पालक यांचे योगदान अधोरेखित करण्यात आले. पालकांचे मार्गदर्शन तितकेच महत्त्वाचे असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल व पुढील वाटचालीसाठी कोकण टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस प्रा. लि.ला सर्व मान्यवर व उपस्थितांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह पालक आणि स्थानिक मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली व कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.