संततधार पावसाने आंबेवाडी नाक्यावर पुरस्थिती,
व्यावसायिकांच्या दुकानात पाणी शिरून मोठे नुकसान, वाहनचालकांसहित प्रवाशी नागरिकांची तारांबल,याला जबाबदार संबंधित ठेकेदार
✍️तेजपाल जैन ✍️
कोलाड प्रतिनिधी
📞8928847695📞
कोलाड :- संततधार पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आंबेवाडी बाजारपेठेत तसेच रोहा कडे जाणाऱ्या द.ग. तटकरे चौकात पाणीच पाणी साचून पुरस्थिती निर्माण झाली असुन या पुराचे पाणी व्यावसायिकांच्या दुकानात शिरूर व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे.तसेच यामधून मार्ग काढतांना वाहचालकांसहित प्रवाशी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याला जबाबदार संबंधित ठेकेदार दार असल्याचे बोलले जात आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महाराष्ट्र ६६ वरील चौपदरी करणाचे काम गेली १८ वर्षांपासून सुरु असुन आंबेवाडी नाक्यावरील निस्कृष्ठ दर्जाचे संबंधित ठेकेदारांनी केलेले काम पुन्हा एकदा समोर आले.असुन या नाक्यावरील ठेकेदार यांनी बनवले गटार वर व रस्ता खाली यामुळे येथे पाणी जाण्यासाठी जागा उरली नाही.याचा नाहक त्रास व्यावसायिकांसह प्रवाशी नागरिक यांना भोगावा लागत आहे.
गणेश उत्सव आठ दिवसावर आला असुन यामुळे आंबेवाडी येथील व्यापारी वर्गानी आपल्या दुकानात माल भरून ठेवला आहे.परंतु दोन दिवस सतत पडत असलेल्या तुफान पावसामुळे पुरस्थिती निर्माण होऊन पुराचे पाणी दुकानात शिरून व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याला जबाबदार संबंधित ठेकेदार असुन यांनी बनविलेल्या निस्कृष्ठ दर्जाच्या गटारामुळे या बाजारपेठेत पाणी साचून पूर स्थिती निर्माण होत असुन याचा फटका व्यापारी वर्गासहित नागरिकांना भोगावा लागत आहे.अशी संतप्त प्रतिक्रिया रहिवाशी नागरिक यांच्या कडून व्यक्त करण्यात येत आहे.