रांजणखार येथे श्री. लीलामृत ग्रंथाचे पारायण सोहळा संपन्न.

131

रांजणखार येथे श्री. लीलामृत ग्रंथाचे पारायण सोहळा संपन्न.

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- अलिबाग तालुक्यातील रांजणखार येथे जगद्गुरु श्रीस्वामी नरेंद्रच्यार्य महाराज सेवा केंद्राच्या वतीने श्री स्वामी नरेंद्राच्यार्य महाराज लिखित श्री लीलामृत ग्रंथाचे पारायण सोहळा संपन्न झाला. पहाटे काकड आरती नंतर पारायणास सुरुवात झाली २१ अध्यायांचे पारायण दुपारी पूर्ण झाले. या मध्ये गावातील सर्व भाविकांनी वाचन, श्रवन आणि कीर्तन भक्तीचा लाभ घेतला.

या मुळे गावातील वातावरण भक्तिमय झाले होते. प्रपंचात राहून परमार्थ करा आणि स्वप्नात सुद्धा कोणाचे वाईट चिंतु नका तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जागवा हा संदेश ध्यानी ठेवा मग पहा जीवनाचे कल्याण कसे होते ,अशी शिकवण दिली जाते.

या वेळी रांजणखार सेवा केंद्राच्या वतीने गावातील दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
६२ वेळा रक्त दान करणारे रक्तदाते जयवंत पाटील यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
सर्व भाविकांना महाप्रसादाचे आयोजन केले होते.पारायण सोहळ्या साठी श्री संप्रदाय चे अलिबाग तालुका मा. अध्यक्ष मधुकर मोकल,
अलिबाग तालुका बटालियन प्रमुख विद्याधर ठाकूर, धर्म क्षेत्र प्रमुख सौ. मेघा मोकल , रांजणखार सेवा केंद्र प्रमुख सौ. कांचन म्हात्रे, अध्यक्ष. शिल्पा पाटील , मच्छिंद्र म्हात्रे,प्रमिला पाटील , ग्रामपंचायत सदस्य दिप्ती पाटील,शालिनी पाटील,सुमन मोकल , गणेश म्हात्रे ,विनायक पाटील,जनार्दन ठाकूर , सुरेंद्र म्हात्रे , संजय .द. पाटील, प्रल्हाद पाटील , विलास म्हात्रे, ए.बी. म्हात्रे व ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच घे भरारी महिला सदस्यांनी विशेष सहकार्य लाभले.