डॉ.निलेश राणे यांची हरियाणा येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय निवडणुकीत “महासंचालक” पदी निवड.

डॉ.निलेश राणे यांची हरियाणा येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय निवडणुकीत “महासंचालक” पदी निवड.

मनोज एल खोब्रागडे
✍🏻सह संपादक✍🏻
मो. 9860020016

*मुंबई:* अंबाला (हरियाणा) येथील रमाडा एन्कोर हॉटेल मध्ये १७ ऑगस्ट २०२५ रोजी भारतीय क्रीडा विकास आणि पदोन्नती फेडरेशनची राष्ट्रीय वार्षिक बैठक व निवडणुक यशस्वीरित्या संपन्न झाली, या बैठकीत फेडरेशनच्या भविष्य आणि भारतात खेळांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या धोरणांवर चर्चा करण्यात आली, तसेच बैठकीनंतर फेडरेशनच्या निवडणुका घेण्यात आल्यात, ही महत्वाची प्रक्रिया वरिष्ठ क्रीडा प्रशासक श्री.सतीश राणा यांनी निवडणूक अधिकारी म्हणून पार पडली, ही निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक होती, ज्यामध्ये विविध राज्य व संयुक्त प्रदेशातील सदस्यांनी भाग घेतला होता.

या निवडणूकीमध्ये “महासंचालक” पदासाठी महाराष्ट्रातून एकमेव नामांकन अर्ज डॉ.निलेश राणे यांनी भरला होता, या पदासाठी देशातून काही राज्यातील सदस्यांचा अर्ज देखील आले होते, या निवडणुकीमध्ये शेवटी डॉ.निलेश राणे यांचाच विजय झाला, ते चांगल्या मतांनी निवडून आले, त्यांना नवनियुक्त “महासंचालक” पदाचे विजयी पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

डॉ.निलेश राणे यांच्या विजयाबद्दल महाराष्ट्रासाठी ही गौरवाची बाब आहे, तसेच राज्यातील खेळाडूंनी व क्रीडा प्रेमींनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्यात.