वनहक्क पट्टे समस्याबाबत व कोनसरी प्रकल्पांत आदिवासी युवकांना रोजगार उपलब्ध करून द्या:- कैलास कुमरे
जितेंद्र नागदेवते
सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
8806689909
सिंदेवाही :- चिमूर गडचिरोली लोकसभा मतदारसंघातील चिमूर, ब्रम्हपुरी नागभीड सिंदेवाही तालुक्यातील आदिवासी तरुणांना कोणसरी प्रकल्पांत रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा. तसेच चंद्रपूर जिल्ह्य़ातील वनहक्क पट्टे मिळालेल्या आदिवासींना वारसानाप्रमाणे फेरफार करून देण्यात यावा. सातबारा उताऱ्याप्रमाणे स्वतंत्र सातबारा व नमुना आठ उपलब्ध करून देण्यात यावे याकरिता नुकतेच जिल्हयाचे पालकमंत्री डॉ अशोकजी उईके यांच्या सोबत आदिवासी बांधवांनी निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.
नुकतेच नवरगाव येथे वैयक्तिक भेट देण्यासाठी डॉ अशोकजी उईके आदिवासी विकास मंत्री आले होते. यां भेटी दरम्यान आदिवासी बांधवांच्या समस्या बाबत चर्चा करताना स्थानिक पातळीवरील युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला व ते आदिवासी वनहक्क पट्टे संदर्भातील समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी आदिवासी नेते कैलास कुमरे लक्ष्मीकांत कामतवार तसेच जितेंद्र नागदेवते हे प्रामुख्याने उपस्थित होते.