*रडायचे तरी कुणासाठी… कोरोनाने एकाच वेळी घेतले परीवारातील तीन बळी*

अमरावती:- कोरोना वायरस ने आज परीवार ते परीवार तबाह केले आहे. जुनी वस्ती बडनेरा येथील रहिवासी असलेल्या महिला स्वच्छता कर्मचाऱ्याच्या घरातील ही दुःखदायक घटना आहे. या महिलेच्या पतीच्या नागपूरमध्ये राहणाऱ्या बहिणीचे दोन आठवड्यांपूर्वी निधन झाले. त्यामुळे तो आई – वडिलांसह नागपूरला मयती ला गेला होता. या प्रवासात आधी आई-वडील व नंतर मुलगा असे तिघे कोरोना संक्रमित झाले. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बहिणीच्या अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या भावासह त्यांच्या आई-वडिलांचा लागोपाठ मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना येथे उजेडात आली. पत्नी व दोन मुलींना अनाथ करून बाप गेला. या परीवारावर दुःखाचा पहाड कोसळलेल्या तिघींना नेमके रडायचे तरी कुणाकुणासाठी, असा प्रश्‍न कोरोनाने निर्माण करून ठेवला. विशेष म्हणजे कोविडविरोधात लढण्यात-या योद्धात या कुटुंबांचा सहभाग आहे.
जुनी वस्ती बडनेरा येथील रहिवासी असलेल्या महिला स्वच्छता कर्मचाऱ्याच्या घरातील ही दुःखदायक घटना आहे. या महिलेच्या पतीच्या नागपूरमध्ये राहणाऱ्या बहिणीचे दोन आठवड्यांपूर्वी निधन झाले. त्यामुळे तो आई-वडिलांसह नागपूरला गेला होता. या प्रवासात आधी आई-वडील व नंतर मुलगा असे तिघे कोरोना संक्रमित झाले. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती ढासळत गेली व गत सोमवारी (ता. सात) आई-वडिलांचे एकापाठोपाठ काही तासांच्या अंतराने निधन झाले.
त्यांचे मृतदेह घरी आले नाहीत. त्यांचे अंत्यदर्शन घरातील कुणालाच घेता आले नाही. मुलाला अंत्यसंस्काराला उपस्थिती लावता आली एवढेच. या कुटुंबावरील दुःखाचा अंत येथेच झाला नाही तर आई-वडिलांचे अंत्यसंस्कार आटोपत नाही तोच सोमवारी मुलाचा सुपर स्पेशालिटीतील कोविड रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन आठवड्यात चार जणांचा मृत्यू झाल्याने कुटुंबातील उर्वरित सदस्यांना जबर हादरा बसला आहे.
सासू-सासऱ्यांच्या निधनाचे दुःख ओसरत नाही तोच घरातील कर्ता पुरुष गेला. कालपर्यंत ज्यांचे आवाज घरात होते त्यांचे मृतदेहही घरी येऊ शकले नाहीत. कालपर्यंत ज्यांच्यासोबत आनंदाने राहिलो त्यांचे अंत्यदर्शनही तिघींना घेता आले नाही. रडायचे कुणाकुणासाठी, असा प्रश्‍न त्या महिलेला व त्यांच्या दोन मुलींना पडला. दुःखाचा डोंगर कोसळल्याने भविष्य काय? या प्रश्‍नाचे उत्तर शोधूनही सापडत नसल्याची धक्कादायक स्थिती निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here