गोल्ड लोन देणाऱ्या कंपन्यां चोरीच्या सोन्यावर देत आहे कर्ज

17

*गोल्ड लोन देणाऱ्या कंपन्यां चोरीच्या सोन्यावर देत आहे कर्ज.*

गोल्ड लोन देणाऱ्या कंपन्यांचा भोंगळ कारभार.

media varta news award 2025

वर्धा:– कायद्याच्या नियमानुसार नोंदणी करून सोन्याच्या तारणावर कर्ज देण्यासाठी विविध कंपन्या कार्यरत आहेत. येथे सोने गहाण करताच काही काळातच तुम्हाला कर्ज मिळते. यावेळी त्यांच्याकडून सोन्याच्या खरेदी पावत्या तपासल्या जातात. पण, त्या पावत्या कितपत खऱ्या आणि खोट्या याची शहानिशा होत नाही. आणी सरास चोरोना कर्ज दिल्या जात आहे.
वर्धा जिल्हात सोने तारणावर कर्ज देण्यासाठी अनेक कंपन्या सध्या कार्यरत आहेत. येथे सोने घेऊन या तत्काळ कर्ज मंजूर झाल्याशिवाय राहणार नाही. यात त्यांच्याकडून हे सोने चोरीचे आहे अथवा काय याची कुठलीही शहानिशा होत नसल्याचे पुढे आले आहे. वर्धा पोलिसांनी यवतमाळ येथील अशाच एका कंपनीतून येथील चोरीचे सोने जप्त केले आहे.
कायद्याच्या नियमानुसार नोंदणी करून सोन्याच्या तारणावर कर्ज देण्यासाठी विविध कंपन्या कार्यरत आहेत. येथे सोने गहाण करताच काही काळातच तुम्हाला कर्ज मिळते. यावेळी त्यांच्याकडून सोन्याच्या खरेदी पावत्या तपासल्या जातात. पण, त्या पावत्या कितपत खऱ्या आणि खोट्या याची शहानिशा होत नाही. परिणामी चोरट्यांसाठी अशा कंपन्या खूपच लाभदायी ठरल्या आहेत. अनेक चोरट्यांनी या कंपन्यात सोने तारण करून पैशाची उचल केली आहे. तर बऱ्याच प्रकरणात या कंपन्यातून सोनेही जप्त करण्यात आले आहे.
वर्ध्यातील अल्लीपूर येथे झालेल्या चोरीतील ऐवजही या चोरट्यांनी येथे गहाण करून पैशाची उचल केली आहे. हा चोर पोलिसांच्या हाती आल्यानंतर त्याने चोरीचा मुद्देमाल यवतमाळ येथील मुथुट कंपनीत गहाण केल्याचे कबूल केले. पोलिसांनी तिथे जाऊन या सोन्याबाबत कंपनीला माहिती देत हा मुद्देमाल जप्त केला. असाच प्रकार वर्ध्यात यापूर्वीही घडला होता. यावेळीही गोल्ड लोन देणाऱ्या एका कंपनीतून मोठ्या प्रमाणात सोने जप्त केले होते.
अनेक प्रकरणातील सोने पचल्याचा संशय लोकांनी व्यक्त केला. वर्ध्यातील अल्लीपूर येथे झालेली चोरी वैभव खडसे नामक चोरट्याने केली. त्याने चोरीचे सोने त्याचा सहकारी साहेबराव पवार याच्याकडे दिले. त्याने हे सोने यवतमाळ येथील मुथुट कंपनीत गहाण ठेवून पैशाची उचल केली. सोने गहाण ठेवणारा आरोपी पोलिसांच्या हाती आला म्हणून हे सोने जप्त करता आले. सोने गहाण ठेवणारा आरोपी जर फरार असता तर हे सोने या कंपनीकडे केव्हाच पचले असते. असे अनेक प्रकारातील सोने अशा गोल्ड लोन देणाऱ्या कंपन्यांकडे पचले असावे, असा संशय व्यक्‍त होत आहे.

कागदपत्र तपासणे गरजेचे
गोल्ड लोन देण्याकरिता कार्यरत असलेल्या या कंपन्या कायद्याच्या नियमांची पूर्तता करून कार्यरत आहेत. सोने गहाण करताना त्यांच्याकडून कागदांची तपासणी होते. पण, प्रत्येकवेळी तसे होतेच असेही नाही. वास्तवात त्यांनी येणाऱ्या ग्राहकाकडे असलेले सोने आणि त्याच्याकडे असलेली कागदपत्र तपासणे गरजेचे आहे. यात चोरीचे सोने गहाण केल्याचे पुढे आल्यावर पोलिसांकडून ते जप्त करण्यात येते. यात त्यांचेही नुकसान होते.
नीलेश ब्राह्मणे
पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा वर्धा