लग्नाला नकार देताच तरुणाने स्वतःला पेटवून घेत प्रेमीकेला मारली मिठी

65

लग्नाला नकार देताच तरुणाने स्वतःला पेटवून घेत प्रेमीकेला मारली मिठी

अहमदनगर:- दोघाचे एकमेकांव प्रेम होते. पण ती त्यांचा बरोबर सातत्याने लग्नास नकार देत होती. शेवटी प्रेमीकेचा सततच्या नकाराला त्रासुन तरुणाने स्वतःला पेटून घेतले आणि त्या प्रेमीकेला मिठी मारली. त्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात असलेले मुलीचे वडील देखील ह्या सर्व प्रकारात गंभीर जखमी झाले. पेटवून घेतलेल्या तरुणाचा यात मृत्यू झाला असून सार्थक वसंत बनसोडे (वय २०, रा.साकुरी, ता.राहाता जि. अहमदनगर ) असे या तरुणाचे नाव आहे.
सुत्रा माहितीनुसार, सार्थक बनसोडे हा दुचाकीवरून त्याचे प्रेम असलेल्या तरुणीकडे गेला आणि त्याने या तरुणीला लग्नासाठी विचारणा केली. मात्र तिने लग्नाला नकार दिला. त्यामुळे सार्थकने सोबत आणलेल्या ड्रममधील ज्वलनशील पदार्थ स्वतःच्या अंगावर ओतून पेटवून घेतले आणि संबंधित तरुणी व तिच्या वडिलांना मिठी मारत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेमध्ये सार्थक जवळपास ८५ टक्के भाजला होता त्यामुळे उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला.
सदर तरुणाने केलेल्या ह्या प्रकारात सदर तरुणी देखील ३५ टक्के भाजली असून वडील देखील किरकोळ स्वरूपात भाजले आहेत. शिर्डी पोलीस ठाण्यात संबंधित तरूण सार्थक वसंत बनसोडे (वय २०, रा.साकुरी, ता.राहाता) याच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या घटनेत सार्थक बनसोडे हा तरुण जवळपास ८५ टक्के होरपळला होता. संबंधित तरुणी आणि तिचे वडील ही किरकोळ जखमी झाले असून दोघांवर सध्या उपचार सुरू आहेत.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे हे करीत आहेत.