*दारु विक्रेता महिला आणी मुलगी लोखंडी पाऊशी घेऊन आली पोलिसांच्या अंगावर*

*हिंगणघाट मुकेश चौधरी:-* पोलीसांना मुखबिराकडुन माहिती मिळाली की हिंगणघाट येथील संत तुकडोजी वार्डमध्ये मोठया प्रमाणावर अवैध दारु विक्री सुरु आहे.
हिंगणघाट पोलिसांना माहिती मिळताच, पोलिसची एक टिम अंजू राजु येळणे या दारु विकना-या महीलेच्या घरी धडकली आणी कायदेशीर मार्गाने घराची झडती घेण्यास सुरुवात केली. त्या महिलेचा घराचा पोर्चच्या बाजुला भिंतीला लागून असलेल्या झाडा जवळ एका कापडी पिशवीत अवैध देशी दारुने भरलेल्या 20 सिलबंद बाटल्या किमत 2000 रुपयाचा माल मिळुन आला.
या अवैध दारुचा पंचनामा करुन त्या दारु विकणा-या महिलेला अंजू राजु येळणे ला पुढील कार्यवाही करिता महिला पोलिस कर्मचा-यांनी ताब्यात घेत असता, आरोपी अंजू येळणे ची मुलगी कुमारी काजल राजु येळणे ही धावत आरोपी महिले जवळ आली व माझ्या आईला तुम्ही कसे घेऊन जाता व तुम्ही आई वर कशी केस करता ते मी पाहते असे जोर जोरात ओरडून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. आरोपी अंजू आणी काजल येळणे या दोघींनी पोलिसाच्या ताब्यात असलेला अवैध दारुचा माल हिसकावुन घेऊन घरा शेजारचा नाल्यात टाकुन दिला. तसेच काजल येळणे पोलिसांना बोलली की मी यापुर्वी स्वताःला पेटवुन घेतले होते, यानंतर तुम्ही माझा घरी आले आणी आम्हांला कारवाईचा त्रास दिला तर मी तुम्हचा नावाने खोटी चिठ्ठी लिहुन परत एकदा स्वताःला पेटवुन घेईल आणी तुम्हा सर्वांना फसवुन टाकेल अशी धमकी देऊन काजल ही घरात गेली, व घरातुन एक लोखंडी पावशी घेऊन पोलिसांचा अंगावर धाऊन आली. माझा आईला पोलिस स्टेशनला घेऊन गेलात तर एकाएकाला जीवानीशी ठार मारेल अशी धमकी दिली. दोन्ही महिला आरोपी पोलिस कर्मचा-यांच्या अंगावर धाऊन आल्या व अंजू येळणे हिने अश्लील भाषेत पोलिसांना शिविगाळ केली. व पोलिस करत असलेल्या शासकीय कामात अडथळा केला.
नमुद दोन्ही महिला आरोपी अंजू येळणे वय 47 आणी काजल येळणे वय 19 यांच्याविरुद्ध अप क्र. 535/2020 कलम 353, 294, 506, 34 भा.द.वि सह कलम 65 ई 77 अ म.दा.का अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक डॉ. बस्वराज तेली वर्धा, अप्पर पोलिस अधिक्षक निलेस मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे, पोलिस निरीक्षक सत्यवीर बंडीवार पोलिस स्टेशन हिंगणघाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रामदास खोत, परमेश्वर आगासे, हमीद शेख, संदीप उइके, माला मैद पुढील कार्यवाही करीत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here