बेपत्ता महिलेचा मृतदेह आढळला विहिरीत!

31

बेपत्ता महिलेचा मृतदेह आढळला विहिरीत!
कल्पना मनोहरराव कळबे वय ५५ असे मृत महिलेचे नाव आहे. दोन दिवसांआधी घरच्या शेतात निंदन करण्याकरिता गेलेल्या कल्पना कळबे या घरी परत न आल्याने घरच्या लोकांनी शोध घेण्यास सुरवात केली मात्र त्या कुठेही सापडल्या नाहीत.

अमरावती:- तिवसा तालुक्यातील उंबरखेड येथे दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह आज दुपारी २ वाजताच्या सुमारास त्यांच्याच शेतातील विहिरीत आढळून आल्याने गावात चांगलीच खळबळ उडाली आहे

Chhatrapati Shivaji Maharaj Award 2025

कल्पना मनोहरराव कळबे वय ५५ असे मृत महिलेचे नाव आहे. दोन दिवसांआधी घरच्या शेतात निंदन करण्याकरिता गेलेल्या कल्पना कळबे या घरी परत न आल्याने घरच्या लोकांनी शोध घेण्यास सुरवात केली मात्र त्या कुठेही सापडल्या नाहीत. आज दुपारी काही महिला शेतातील विहिरी जवळ गेल्या असता त्यांना पाण्यावर मृतदेह तरंगताना दिसून आला. या घटनेची माहिती गावात पसरताच गावातील लोकांनी शेतात गर्दी केली. या घटनेची माहिती तिवसा पोलिसांना कळवताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनाकरिता तिवसा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

मात्र दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या महिले संदर्भात तिवसा पोलिस ठाण्यात हरविल्याची तक्रार का करण्यात आली नाही? असा प्रश्न उपस्थत केला जात आहे. बेपत्ता महिलेचा मृतदेह तिच्याच शेतात आढळून आल्याने ही हत्या की आत्महत्या? अशी शंका निर्माण केली जात आहे. पुढील तपास तिवसा पोलिस करीत आहेत.