*तेरा हजारांचे पिककर्ज झाले जिवापेक्षा मोठे; शेतक-याने केली आत्महत्या*
गणेश यांनी बॅंक ऑफ इंडिया बेंबाळ येथून १३ हजार रुपयाचे पिककर्ज घेतल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. याव्यतिरिक्त खाजगी कर्जही मोठ्या प्रमाणावर घेतले होते. पाण्याअभावी शेतपीक घ्यायचे कसे या विंवचनेत गणेश नेहमीच निराश राहत होते.
चंद्रपूर:- मूल तालुक्यातील मौजा बेंबाळ येथील शेतकरी गणेश बालाजी घोगरे (वय ४४ वर्षे) यांनी शेतात किटकनाशक औषधी प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी ११ वाजता उघडकीस आली.
गणेश घोगरे यांची बेंबाळ शेतशिवारात शेती आहे. ते सकाळी १० वाजता घरून शेतात गेले. परंतु, परत आले नाही. यामुळे गणेशची पत्नी पाहण्यासाठी शेतात गेली. यावेळी तो किटकनाशक प्राशन केल्याचे तिला दिसून आले. गणेशला मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले असात डाॅक्टरांनी मृत घोषित केले.
गणेश यांनी बॅंक ऑफ इंडिया बेंबाळ येथून १३ हजार रुपयाचे पिककर्ज घेतल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. याव्यतिरिक्त खाजगी कर्जही मोठ्या प्रमाणावर घेतले होते. पाण्याअभावी शेतपीक घ्यायचे कसे या विंवचनेत गणेश नेहमीच निराश राहत होते. त्यासोबतच बॅंक आणि खाजगी घेतलेले कर्ज भरायचे कसे या चिंतेत असतानाच हा पाउल उचलाला असावा अशी शंका गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.