*घुग्घुस प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी रुजू*
*आम आदमी पार्टीच्या मागणीला यश*

*आम आदमी पार्टीच्या मागणीला यश*
पंकज रामटेके
घुग्घुस प्रतिनिधी
मो.८४८४९८८३५५
दिनांक ११ सप्टेंबर २०२१ रोजी गरोदर माता पल्लवी चूने या महिलेला रात्री सुमारे ११ वाजताच्या दरम्यान पोटामध्ये वेदना होत असताना प्राथमिक आरोग्य केंद्र घुग्घुस इथे आणण्यात आले होते आल्या नंतर कोणताही वैद्यकीय अधिकारी इथे उपस्थित नव्हता. सागर भोयर यांना आम आदमी पार्टी घुग्घुसतर्फे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की त्या रात्रीचा चार्ज एका महिला डॉक्टर कडे होता व ती महिला डॉक्टर त्या रात्रीला अनुपस्थित होती.
या घटनेची दखल घेत आम आदमी पार्टी घुग्घुसतर्फे संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य ती कार्यवाई करून येथे वैद्यकीय अधिकारी नियुक्ती करण्याची मागणी केली होती. अंक्षिता अरुणकुमार कुंडू या महिला वैद्यकीय अधिकारी घुग्घुस प्राथमिक आरोग्य केंद्रात रुजू झाल्या आहे.
त्या रुजू होताच आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष अमित बोरकर यांनी त्यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. घुग्घुस आम आदमी पार्टीच्या मागणीला यश आल्याने त्यांनी प्रशासनाचे आभार मानले आहे.
यावेळी घुग्घुस आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष अमित बोरकर, उपाध्यक्ष अभिषेक सपडी, सहसचिव विकास खाडे, सागर बिऱ्हाडे, सह संघटनमंत्री आशिष पाझारे, अभिषेक तालापेल्ली, संदीप पथाडे, दिनेश पिंपळकर, सोनू शेटियार, प्रशांत सेनानी, रवी शांतलावार, संतोष सलामे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.