प्राथमिक शाळा सुरु करा, शिक्षक परिषदेची मागणी
गटशिक्षणाधिकारी पोंभुर्णा यांना निवेदन देतांना म.रा.शि.प.प्राथमिक तालुका कार्यवाह अरुण यामावार

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
पोंभुर्णा:- राज्यात मागील मार्च 2020 पासून शाळाचे वर्ग बंद असून यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने कोरोना महामारीच्या नियमाला अनुसरून राज्यातील प्राथमिक शाळा सुरु कराव्यात अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक तालुका शाखा पोंभूर्णाच्या वतीने तहसिलदार पोंभूर्णा, गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी पोंभूर्णा यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेयांना एका निवेदनाव्दारे केली आहे.
प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा वयोगट लक्षात घेता आँनलाईन शिक्षण यशस्वी होणे शक्य नाही.नेटवर्क समस्यामुळे ग्रामीण व गरीब पालकांना परवडणारे नसल्याने आँनलाईन शिक्षणाच्या नावाखाली या लहान विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होत आहे. प्राथमिक शिक्षण पाया असून शिक्षणाचा पायाच ठिसूळ होत असल्याचे चित्र आहे. कोरोना महामारीच्या नियम व अटीनुसार ग्रामीण क्षेत्रात कोरोना वाढत असल्याचे चित्र दिसून येत नाही त्या अनुसंगाने इयत्ता 1 ते 7 वी चे टप्प्याने वर्ग सुरु करण्यास हरकत नसल्याचे सुध्दा निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे या सर्व प्रकारामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे हे थांबविण्यासाठी प्राथमिक शाळा सुरु कराव्यात अशी मागणी केली जात आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक पोंभूर्णा तालुका शाखा अध्यक्ष बंडूजी गायगोले, तालुका कार्यवाह अरुण यामावार उपस्थित होते.