बेरीस्ते-ओसरविरा ग्रामपंचायत येथील कल्याण आश्रम येथे बालक पालक पोषण मेळावा साजरा
सौरभ कामडी
मोखाडा प्रतिनिधी
पालघर : जिल्हा पालघर प्रकल्प मोखाडा विभाग आसे २ अंतर्गत अंगणवाडी कार्यक्षेत्रात दिनांक १५/९/२०२३ रोजी बेरीस्ते-ओसरविरा ग्रामपंचायत येथील कल्याण आश्रम येथे बालक पालक पोषण मेळावा आयोजित करण्यात आला. पर्यवेक्षिका सुवर्णा पाटील यांनी अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या सहकार्यातून पोषण महा आधारित एक परिपूर्ण आणि आगळावेगळा पोषण मेळावा आयोजित केला. सन २०२३-२४ हे वर्ष तृणधान्य धान्य वर्ष म्हणून घोषित करण्यात आले तसेच एक सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या महिन्यात पोषण महा साजरा केला जातो.
यावर्षी पोषण महांतर्गत अनेक विषय आधारित संकल्पना आहेत. निव्वळ स्तनपान व पूरक आहार, स्वस्त बालक बालिका, ॲनिमिया मुक्त भारत, आयुष जीवनशैली, मेरी माटी मेरा देश अशा संकल्पना आधारित कृतीयुक्त बालक पालक पोषण मेळावा पर्यवेक्षिका सुवर्णा पाटील यांनी २६ स्टॉल लावून साजरा केला सदर स्टॉल मध्ये स्थानिक व पौष्टिक रानभाज्या रानमेवा आधारित अनेक पौष्टिक रेसिपी मातांना दाखविण्यात आल्या. सहा महिने ते दोन वर्ष बालके तसेच गरोदर-स्तनदा माता यांचा यांचा आहार कसा असावा याची छान मांडणी केलेली होती.
शून्य ते सहा वर्षापर्यंत बालकांचा बौद्धिक विकास झपाट्याने होत असतो त्यामुळे बौद्धिक विकासावर आधारित उपक्रम पालकांनी बालकांसोबत खेळले आणि बालकांबरोबर पालकांनाही त्यातून आनंद मिळाला आणि खेळातून पोषण कसे होते हे ही समजले. गरोदर मातेचा माझ्याशी बोला आणि संवेदनशील पालकत्व तसेच तोंडातला घास या स्टॉलला पालकांची गर्दी आढळून आली. यातून बालकांचे पालन पोषण करताना संवेदनशील होणे किती महत्त्वाचे आहे हे कळाले. त्याचबरोबर बालकांचा भावनिक विकास होणारे अनेक उपक्रम मांडण्यात आले त्यात आवाजाचे उपक्रम बाहुली घर खेळघर पोषणाची सापशिडी पाण्याची खेळ मेंदूचे जाळे आणि बोगदा असे अनेक उपक्रमानी बालक व पालकांना आकर्षित केले.
बॅरिस्ते गावातील आणि अनेक पाढ्यातून बालक पालक उपस्थित होते. तसेच महिला बालकल्याण विभागाचे विस्तार अधिकारी बेरिस्ते-ओसरविरा ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच साहेब हिरामण मौळे आणि सदस्य यांनी देखील प्रत्येक उपक्रमात सहभाग नोंदवला. गॅब्रियल संस्था मोखाडा यांनी हात धुण्याचे प्रात्यक्षिक दाखवून बालकांना केळी वाटप केली सोबत अंगणवाडीतून पालक व बालकांना चिवडा वाटप करण्यात आला प्रत्येक पालक व बालकांची स्वागत कक्षात नोंद करण्यात आली तसेच जाताना पालकांचे अभिप्राय ही घेण्यात आले.
अशाप्रकारे पोषणावर आधारित खेळातून पोषण कसे होते हे पालकांना नक्की समजले पर्यवेक्षिका सुवर्णा पाटील यांनी आपल्या प्रशिक्षणाचा पुरेपूर वापर करून हा मेळावा आयोजित केला होता अंगणवाडी सेविका मदतनीस ताई आणि पालकांमध्ये एक उत्साह निर्माण झाला मार्गदर्शन करून तसेच कृतीयुक्त कार्यक्रम घेऊन आपण सर्वजण मोखाडा तालुक्यातील कुपोषण आणि विविध उपाययोजना करू असे पर्यवेक्षिका सुवर्णा पाटील यांनी पालकांना सांगितले आहे