संबोधी बुध्द विहार’ आणि ‘साई मंदिर’ उद्घाटन सोहळा आमदार मा.राहुलजी नार्वेकर साहेबांच्या शुभहस्ते संपन्न 

56

‘संबोधी बुध्द विहार’ आणि ‘साई मंदिर’ उद्घाटन सोहळा आमदार मा.राहुलजी नार्वेकर साहेबांच्या शुभहस्ते संपन्न 

गुणवंत कांबळे

मुंबई प्रतिनिधी

मुंबई-महापालिका वसाहत कोचीन स्ट्रीट फोर्ट मुंबई 400001येथील स्थानिक आमदार माननीय राहुलजी नार्वेकर साहेब यांनी आमदार निधीतून संबोधी बुध्दविहार आणि साई मंदिराची पुनर्बांधणी केली. दिनांक 13/09/2023 रोजी त्यांच्याच शुभहस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

सदर कार्यक्रमात आमदार माननीय राहुलजी नार्वेकर साहेबा बरोबर महाराष्ट्र सरकारने 24 ऑगस्ट 2023 रोजी सफाई कामगारांच्या हक्काच्या विरोधात काढलेला आदेशावर सविस्तर चर्चा करून तो आदेश रद्द करण्यात यावा.असे लेखी निवेदन रुपेश पुरळकर यांनी दिले.त्यावेळी आमदार राहुलजी नार्वेकर साहेबांनी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

सफाई कामगारांच्या हक्काची बाजू मांडण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल बौध्दजण पंचायत समिती शाखा क्रमांक 11 चे अध्यक्ष माननीय बाळकृष्ण कदम साहेब तसेच सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.