८०१ ग्रामपंचायतीना हिरवे कार्ड जलस्तोत्राचे दोन वेळा सर्वेक्षण

८०१ ग्रामपंचायतीना हिरवे कार्ड जलस्तोत्राचे दोन वेळा सर्वेक्षण

८०१ ग्रामपंचायतीना हिरवे कार्ड जलस्तोत्राचे दोन वेळा सर्वेक्षण
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: साथीचे आजार पसरू नयेत यासाठी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्तोत्राची स्वच्छता सर्वेक्षण वर्षातून दोन वेळा करण्यात येते. या सर्वेक्षणामध्ये तीन वर्षात जिल्ह्यातील एकही ग्रामपंचायतला लाल कार्ड देण्यात आलेले नाही. रायगड जिल्ह्यातील ८१२ ग्रामपंचायतीमधील ६हजार ८९ सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये ८०१ ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड देण्यात आले असून ११ ग्रामपंचायतीना पिवळे तर एकाही ग्रामपंचायतला लाल कार्ड देण्यात आले नाही.

पिण्याच्या पाण्यामुळे कावीळ,कॉलरा, अतिसार, टायफड ,गॅस्ट्रो, खरूज व अन्य त्यासाठी आजार पसरतात. ग्रामपंचायतीकडून जलसोत्राचे सर्वेक्षण करून ते दूषित होऊ नये म्हणून पाणी शुद्धीकरण केले जाते. त्यासाठी जलसोत्राचे सर्वेक्षण हे एप्रिलमध्ये मान्सूनपूर्व आणि मान्सून पश्चात ऑक्टोबर महिन्यामध्ये करण्यात येते. लाल कार्ड ग्रामपंचायत मधील ५०% पेक्षा जास्त लोकसंख्या तीव्र जोखमीच्या स्तोत्रावर अवलंबून ग्रामपंचायतिला लाल कार्ड देण्यात येते. पिवळे कार्ड देताना गावातील प्रत्येक स्तोत्राची जोखीम नमूद करतात. ग्रामपंचायतीमधील ५०% व ५० टक्के पेक्षा जास्त लोकसंख्या तीव्र जोखीम अथवा कमी जखमीच्या स्तोत्रावर अवलंबून नसल्यास त्या ग्रामपंचायतीस पिवळे कार्ड दिले जाते.
हिरवे कराड ग्रामपंचायत मधील ५०% पेक्षा जास्त लोकसंख्या कमी जोखमीच्या स्तोत्रावर अवलंबून असलेल्या ग्रामपंचायतीस हिरवे कार्ड देण्यात येते.

रायगड जिल्ह्यात ६हजार८९ जलसोत्राची तपासणी
जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्राकडून जल स्तोत्राचे सर्वेक्षण केले जाते.वर्षातून दोन वेळा जलसोत्राचे सर्वेक्षण करण्यात येते.ही तपासणी मान्सूनपूर्व आणि सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या मान्सून पश्चात करण्यात येते. यामध्ये मागील तीन वर्षात रायगड जिल्ह्यातील एकही ग्रामपंचायतला रेड कार्ड मिळाले नसल्याचे माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here