शिध्याविनाच गणेशोत्सव पुरवठा विभागाकडून जिन्नस न आल्याने वाटप रखडले

शिध्याविनाच गणेशोत्सव
पुरवठा विभागाकडून जिन्नस न आल्याने वाटप रखडले

शिध्याविनाच गणेशोत्सव पुरवठा विभागाकडून जिन्नस न आल्याने वाटप रखडले

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: गोरगरिबांना गौरी -गणपतीचा सण आनंद साजरा करता यावा यासाठी राज्य सरकारने ‘आनंदाचा शिधा’ वाटण्याचे जाहीर केले होते. परंतु गणेशोत्सव संपला तरी आनंद शिधा जिल्ह्यात पोहोचलाच नाही. काही ठिकाणी रवा आहे, तर साखर नाही गोडेतेल आहे,तर चणाडाळ नाही, असा सावळा गोंधळ जिल्हात सुरू आहे. लाभार्थी दुकानात फेऱ्या मारून वैतागले.वाटप करण्यासाठी शिधा आलेलाच नसल्याने रेशन दुकानदार ही दुकाने बंद करून गणेशोत्सव साजरा करण्यासाठी निघून गेले. यामुळे लाभार्थ्यांमध्ये सरकारच्या भोंगळ कारभाराबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
गणेशोत्सव निमित्त ‘आनंदाचा शिधा’ म्हणजे शंभर रुपयात रवा ,चणाडाळ गोडा तेल, साखर असे चार जिन्नस मिळणार होते. सोमवार पर्यंत जिल्ह्यातील एकही तालुक्यात चारही जिन्नस पोचले नाहीत. त्यामुळे दुकानदारांना वाटप करताना येत नाही.सणाचे दिवस संपल्यानंतरच आनंदाचा शिधा वाटपाची परंपरा रायगड जिल्ह्यात दोन वर्षापासून सुरू आहे. परिणामी जिल्ह्यात मागणी होणाऱ्या किटची संख्या दिवसेंदिवस घडत आहे.
जिल्ह्यात लाभार्थी कार्ड धारकांची संख्या 4 63 हजार 610 इतकी आहे.यापैकी तीन लाख 96 हजार 991 इतकाच लाभार्थ्यांसाठी आनंदाचा शिधा मंजूर झाला आहे.लाभार्थ्यांपर्यंत धान्य किंवा त्यातील काही वस्तू न पोहोचवता त्या वस्तूंची खुल्या बाजारात विक्री करायची अशा प्रकारे सुरू आहेत.रेशन वरील धान्य वितरणात सुसूत्रता यावी यासाठी आधुनिक तंत्राचा वापर करण्यात येत असला तरी त्यातही गैरप्रकार होत असल्याचे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे.काही दिवसांपूर्वी धान्य वितरण व्यवस्थेच्या सर्वर मध्ये बिघाड निर्माण झाल्याने ईपॉस प्रणाली द्वारे केला जाणारा ऑनलाईन धान्य पुरवठा बंद करून ऑफलाइन धान्य वाटप सुरू करण्यात आले होते.मात्र जिन्नस न आल्याने नेहमीप्रमाणे आताही जिल्हा पुरवठा विभागाला आनंदाच्या शिधाचे वेळेत वाटप करण्यात अडचणी येत आहेत. सण उत्सवा आधी आनंदाचा शिधा मिळाला, असे आतापर्यंत एकदाही झालेले नाही. होळी दिवाळी गणेशोत्सव नंतरच आनंदाच्या शिधाचे वाटप होते. शेवटच्या ग्राहकांना काही वस्तू मिळतात तर काही वस्तू किट मधून गायब झालेले असतात.

“आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची बंधने रेशन दुकानदारावर घालण्यात आली. परंतु वरिष्ठ पातळीवर वितरण व्यवस्था वाहतूक ठेकेदाराच्या नेमणुका यामध्ये कमालीचा गोंधळ आहे. यामध्ये सर्वसामान्य लाभार्थी भरडले जात आहेत. सरकारच्या योजनांचा लाभ योग्य व्यक्तींना मिळत नाही.
-प्रमोद घोसाळकर, जिल्हाध्यक्ष रायगड रेशन दुकानदार संघटना

“एकाही गोदामा मध्ये पूर्ण कीट नाही चार जिन्नस मिळून एक कीट पूर्ण झाल्याशिवाय त्याचे वितरण करता येत नाही. त्यामुळे आता वाटप सुरू झाले नाही.वाहतूक कंत्राट दारामुळे हे जिन्नस पोहोचण्यात अडथळा येत आहे. त्यामुळे आनंद शिधा केव्हा मिळेल हे नक्की सांगता येत नाही.
-सर्जेराव सोनवणे, पुरवठा अधिकारी, रायगड

“आनंद शिदा वाटपा संदर्भात सरकारने दिलेला शब्द पाळण्यासाठी पूर्वतयारी करता येत नाही ही लाजिरवाणी गोष्ट आहे. वाहतूक कंत्राट दारामुळे विलंब होत असल्याचे बोलले जात आहे. मात्र हा सर्व प्रकार टक्केवारी घेण्यासाठी आहे. गोरगरिबांच्या ताटातील पदार्थ काढून टक्केवारी घेणाऱ्यांना काय मिळणार?
– संजय पाटील, लाभार्थी.
– –
*लाभार्थ्यांना न्याय कधी?*

रास्त भाव दुकानातून धान्य घेणाऱ्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बेताची असते. याचाच गैरफायदा काही दुकानदार घेतात.आधुनिक तंत्राचा वापर करीत दुकानदारांवर अनेक निर्बंध आणण्यात आले. परंतु वरिष्ठ स्तरावर होणारे गैरप्रकार तसेच आहे. जे सर्वसामान्य लाभार्थ्यांच्या कल्पने पलीकडचे आहेत.

*एकाही गोदामात पुरेसा शिधा नाही*
वेळ पुरवठा होण्यासाठी गोदामामध्ये शिधा धान्य असावे लागते. जिल्ह्यातील 21 पैकी अलिबाग, पोयनाड, पेण येथील गोदामा मध्ये फक्त साखर आलेली आहे. तर इतर गोदामा मध्ये रवा आहे तर चणाडाळ नाही अशी परिस्थिती आहे.यात किती दिवस जातील हेच पुरवठा अधिकाऱ्यांना सांगता येत नसल्याने आनंदाच्या शिधासाठी किती दिवस वाट पाहावी लागणार असा प्रश्न लाभार्थी कडून विचारण्यात येत आहे.

*राज्यभरातील लाभार्थी वंचित*
कोकणातील घराघरात गणेश उत्सव साजरा केला जातो त्यामुळे येथील जिल्ह्यांमध्ये आनंदाचा शिधा वेळत द्यावा अशी मागणी लाभार्थ्यांकडून होत होती.वाहतूक कंट्रकदाराच्या दिरंगाईमुळे रायगड सह रत्नागिरी, नांदेड, हिंगोली, जळगाव, गडचिरोली, गोंदिया, धाराशिव, बीड, भंडारा, या दहा जिल्ह्यात अजून शिदेचे वितरण सुरू झालेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here