नागपूर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने या आर्थिक वर्षात १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत १२६ कोटी ५९ लाख रुपयांची केली वसुली

18

नागपूर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने या आर्थिक वर्षात १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत १२६ कोटी ५९ लाख रुपयांची केली वसुली

✍🏻मंजुषा सहारे✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो. 9373959098

नागपूर :- सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की या वर्षी नागपूर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने या आर्थिक वर्षात १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत १२६ कोटी ५९ लाख रुपयांची वसुली केली आहे. मालमत्ता कराच्या वसुलीच्या संदर्भात आढावा बैठक महानगरपालिकेच्या मुख्यालयात पार पडली.यावेळी आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी त्यांनी विभागाचे कौतुक केले. तसेच मालमत्ता कर थकबाकीदारांकडून वसुली करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात याव्या, अधिकाधिक कर वसुलीवर भर द्यावा, असे निर्देश आयुक्तांनी बैठकीत दिले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी, उपायुक्त मिलिंद मेश्राम, उपायुक्त श्री. गणेश राठोड, नगररचना विभागाचे उपसंचालक श्री. ऋतुराज जाधव, लक्ष्मीनगर झोनचे सहायक आयुक्त श्री. सतीश चौधरी, धरमपेठ झोनच्या सहायक आयुक्त श्रीमती स्नेहलता कुंभार, हनुमाननगर झोनचे सहायक आयुक्त श्री. नरेंद्र बावनकर, धंतोली झोन श्री. प्रमोद वानखेडे, सतरंजीपूरा झोनचे सहायक आयुक्त श्री. धनंजय जाधव, लकडगंज झोनचे सहायक आयुक्त श्री. विजय थूल, आशीनगर झोनचे सहायक आयुक्त श्री. हरीश राऊत व झोन अधिकारी, कर अधीक्षक उपस्थित होते.