Home latest News रायगड जिल्ह्यातील मुली होणार क्रिकेट पंच,उरण येथे आरडीसीए तर्फे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.
रायगड जिल्ह्यातील मुली होणार क्रिकेट पंच,उरण येथे आरडीसीए तर्फे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने क्रिकेटचा स्तर प्रत्येक जिल्ह्यात वाढावा ह्या हेतूने पुरुषानं बरोबर महिलांना देखील क्रिकेट खेळाचे पंच होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.सध्या आंतरराष्ट्रीय स्तरापासून पासून अगदी जिल्हा स्तरापर्यंत क्रिकेट सामन्यासाठी महिला पंच आपले योगदान देताना आपल्याला पहायला मिळतात.रायगड जिल्ह्यात सुधा पुरुषानं बरोबर महिला क्रिकेट पंच तयार व्हावेत यासाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने उरण येथील डी.के भोईर यांच्या माऊली हॉल येथे मंगळवारी करण्यात होते.महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या पंच परिक्षेची पूर्व तयारी करण्यासाठी सदरच्या शिबीराचे आयोजन करण्यात आले होत.शिबीरात मार्गदर्शन करण्यासाठी बीसीसीआयचे पंच तथा माजी रणजीपट्टू हर्षद रावले प्रमुख मार्गदर्शक व क्रिकेट नियमाचे तज्ञ नयन कट्टा यांच्या सह एमसीए पॅनलचे पंच विघ्नहर्ता मुंढे,रोहन पाटील,प्रशांत माळी, उरण क्रिकेट असोसिएशनचे सदस्य केशरीनाथ म्हात्रे उपस्थित होते.एमसीए तर्फे २० सप्टेंबर रोजी महिलांच्या पंच परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून परिक्षा लेखी,तोंडी व प्रत्येक्षिक स्वरूपात घेतली जाणार आहे.रायगड जिल्ह्यातील महिला क्रिकेटपटू श्रुती अडित,अस्मिता गोवारी,साची बेलोसे,गार्गी साळुंखे यांनी प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभाग घेतला होता.आरडीसीएचे
उपाध्यक्ष राजेश पाटील यांनी शिबिरामध्ये उपस्थित राहून
प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या व डी.के भोईर यांनी हॉल विनामूल्य शिबिरासाठी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील व सचिव प्रदीप नाईक यांच्या सह सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी प्रशिक्षणार्थींना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.