परतीच्या पावसामुळे शेतकरी संकटात, ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांची मागणी.
प्रतिनिधी विनायक सुर्वे
वाशिम:- परतीच्या पावसामुळे जिल्ह्यात काढणी झालेले सोयाबीन शेतात भिजले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पावसामुळे सोयाबीनच्या प्रतवारीवर विपरित परिणाम झाल्याने लागवड खर्चही वसूल होणार नाही, त्यामुळे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहेत.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार 10 ऑक्टोंबर पासून वाशिम जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. या परतीच्या पावसामुळे जिल्ह्यात काढणी झालेले सोयाबीन शेतात भिजले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे यावर्षी शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत आहे. यंदा जिल्ह्यात २ लाख ९३ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. सप्टेंबर महिन्यातही ऐन मूग, उडीद सोयाबीन सोंगणीच्या हंगामात संततधार पाऊस ठाण मांडून असल्याने मूग, उडिदाचे प्रचंड नुकसान झाले. सप्टेंबर महिन्यात जवळपास ३५ टक्के सोयाबीन सोंगणी झाली. ऑक्टोबर महिन्यात उर्वरित शेतकऱ्यांनी सोयाबीन सोंगणीला वेग दिला. दरम्यान १० ऑक्टोबरपासून जिल्ह्यात विजेच्या कडकडाटांसह सर्वदूर संततधार पाऊस सुरू झाला आणि शेतकऱ्यांनी शेतात सोंगून ठेवलेल्या सोयाबीनच्या पेंढ्या पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांवर जणू आर्थिक संकटच कोसळले.पावसामुळे सोयाबीनच्या प्रतवारीवर विपरित परिणाम झाल्याने लागवड खर्चही वसूल होणार नाही जगाचा पोशिंदा म्हणून घेणाऱ्या शेतकरीच आज उपासमारीची वेळ येणार का यामुळे चिंताग्रस्त झाला आहे
तरीसुद्धा राज्याचा कारभार हाकनाऱ्या शासनाला मात्र अजूनही पाझर फुटलेले नाही. पंचनाम्याचे आदेश दिलेत,यापलीकडे काहीच होताना तर दिसत नाही व सरकाराकडून कुटलेही ठोस दिलासा दिला जात नाही. अशी टीका शेतकरी वर्गातून होत आहे.
लवकरात लवकर शेतकरी हिताचे सरकारने निर्णय घ्यावा व जिल्ह्यातील ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.